शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मित्राच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 20:46 IST

मित्राकडून पैशांसाठी होणारी छळवणूक, संशयी वृत्ती आणि मारहाणीच्या प्रकाराला कंटाळून लोकमान्यनगर येथील सोनाली बसरा या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३ मे रोजी घडली.

ठळक मुद्देपैशाची मागणी करीत वारंवार दिली धमकी मारहाण करुन मानसिकही त्रास दिला वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे : पैशासाठी शारीरिक मानसिक छळ करणाऱ्या जुगल राठोड या मित्राच्या छळाला कंटाळून सोनाली बसरा (२१, रा. परेरानगर, लोकमान्यनगर, ठाणे) या तरुणीने आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३ मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी टीएमटीमध्ये वाहक असलेल्या जुगलविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात तिच्या पालकांनी गुन्हा दाखल केला आहे.सोनाली आणि तिचे वडील चंद्रकांत बसरा हे ठाण्यातील लोकमान्यनगर येथे वास्तव्याला आहेत. तर तिची आई अनंतनगर, खोपदा, (जव्हार, जि. पालघर) येथे वास्तव्याला आहे. सोनाली ठाण्यातील एका मॉलमध्ये नोकरी करते. गेल्या अनेक दिवसांपासून तिचा मित्र जुगल हा तिच्याकडे वारंवार पैशांची मागणी करीत होता. पैसे देण्यास तिने विरोध केल्यानंतर तिला तो मारहाणही करीत होता. तिच्यावर तो संशयदेखील घेत असे. क्षुल्लक कारणावरून तिला तो दमदाटीही करीत असे. या सर्वच कारणाला कंटाळून आपण आत्महत्या करणार असल्याचे सोनालीने जव्हार येथे असलेल्या आपल्या आईला फोनवरून ३० एप्रिल रोजी सांगितले होते. २ मे रोजी वडील काही कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर सकाळी १० ते ३ मे रोजी पहाटे १.१० वा. च्या दरम्यान तिने लोकमान्यनगर येथील आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिचे वडील चंद्रकांत बसरा यांनी जुगल याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या प्रकारानंतर तो पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले. महिला पोलीस उपनिरीक्षक स्रेहल अडसुळे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या