शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातून तीन वर्षांपासून बेपत्ता मुलीचा लागला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:46 IST

गेल्या तीन वर्षांपासून ठाण्याच्या मुंब्रा भागातून बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय मुलीचा फेसबुकच्या आधारे शोध घेण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. घरातील कौटुंबिक कलहातून तिने घर सोडले होते, कोणीही तिचे अपहरण केले नसल्याचेही तिने पोलिसांना सांगितले.

ठळक मुद्देअपहरण नसून स्वत: घरातून गेल्याचे केले मान्यठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरीफेसबुकच्या आधारे लागला तपास

ठाणे: गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाला यश आले आहे. मोबाईलवरील एक अ‍ॅप आणि फेसबुकच्या आधारे तिचा शोध घेण्यात या पथकाला यश आले. कोणीही अपहरण केले नव्हते, कौटूंबिक कलहातून घरातून निघून गेल्याची कबूली तिने पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंब्रा येथील एका ४० वर्षीय महिलेच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार ५ नोव्हेंबर २०१६ रोजी दाखल झाली होती. याप्रकरणी ७ जानेवारी २०१७ रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. या मुलीचा शोध लागत नसल्याने हे प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू महाले हे याप्रकरणी तपास करीत होते. याच मुलीची मोठी बहिण आणि तिच्या पतीने दहा दिवसांपूर्वी टिकटॉक या अ‍ॅपवर भोजपुरी गाण्याचा एकत्रित व्हीडीओ अपलोड केला होता. हाच व्हिडीओ पाहून या मुलीने मेव्हण्याचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्याच्याशी तिने मेसेंजर मार्फत चॅटींग केली. त्याचवेळी तिने घरातील इतरांचीही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब त्या मुलीच्या मेव्हण्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या निदर्शनास आणून दिली. तेंव्हा ती एका बनावट अभय शेट्टी या बनावट नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन त्याच्याशी चॅटींग करीत असल्याचे उघड झाले. त्याचवेळी पोलिसांनी शक्कल लढवून मेव्हण्याची सासू अर्थात तिची आई आजारी असल्याचा तिला मेसेज पाठविला. हा मेसेज पाहिल्यानंतर तिने व्हिडीओ कॉल केला. त्याचवेळी ती अभय शे टृटी नसून बेपत्ता असलेली अल्पवयीन मुलगी असल्याचे तिनेच मान्य केले. तिने भेटायला येण्याचेही मान्य केले. ती २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता तिच्या चरईतील बहिणीला भेटण्यासाठी आल तेंव्हा पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये ५ नोव्हेंबर २०१६ रोजी घरातून कौटूंबिक कलहामुळे निघून गेल्यानंतर गोरेगाव येथे वास्तव्याला होती. त्यानंतर कॅटरींगचे कामासाठी सुरत (गुजरात) येथे ती गेली. पुढे गुजरात येथून वसईमध्ये आठ ते नऊ महिने राहिली. सध्या नालासोपारा येथे वास्तव्याला होती. आता आपली कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं