शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे अमिष दाखवून धावत्या ट्रेनमध्ये प्रियकरानेच केले तरुणीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 21:01 IST

लग्नाचे अमिष दाखवित गोरखपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर तिच्याच कथित प्रियकराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी ठाणे रेल्वे स्थानकात घडली. या घटनेनंतर मुलीने तशाच अवस्थेत मनमाडपर्यंत प्रवास केला. धक्कादायक बाब म्हणजे याच मुलासोबत पळून जाण्यासाठी तिने घरातून दोन लाखांची रोकड आणली होती.

ठळक मुद्दे ठाण्यातील धक्कादायक घटना आरोपीचा शोध सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: लग्नाचे अमिष दाखवित गोरखपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर तिच्याच कथित प्रियकराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी ठाणे रेल्वे स्थानकात घडली. या घटनेनंतर मुलीने तशाच अवस्थेत मनमाडपर्यंत प्रवास केला. धक्कादायक बाब म्हणजे याच मुलासोबत पळून जाण्यासाठी तिने घरातून दोन लाखांची रोकड आणली होती. ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात याप्रकरणी शुक्रवारी तक्रार दाखल झाली असून या मुलाचा रेल्वे पोलीस आता शोध घेत आहेत.मुळचा उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील रहिवाशी असलेला अभिनव सिंग (१९) आणि पिडित तरुणी हे शालेय जीवनापासूनच एकमेकांचे मित्र आहेत. दहावीपर्यंत मालाडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर तो पुन्हा गोरखपूरमध्ये गेला होता. ‘आता आपण लग्न करु’, असे अमिष त्याने तिला दाखविले होते. त्यामुळे तो गोरखपूर येथून मुंबईतील मालाडमध्ये अलिकडेच आला होता. १ फेब्रुवारी २०२१ रोजी त्याने तिच्याकडे लग्नाचा प्रस्तावही ठेवला. १० फेब्रुवारी रोजी पहाटेच त्याने गोरखपूरला जाण्यासाठी तिला लोकमान्य टिळक टर्मिनल येथे बोलविले. १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईनच्या दिवशी लग्नाची त्याने योजना आखली होती. त्याच्या सांगण्यानुसारच तिने तिच्या घरातून दोन लाखांची रोकडही बॅगेत आणली. ही रोकड तिने त्याच्याकडे सोपवून गोरखपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये दोघेही १० फेबु्रवारी रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बसले. ही ट्रेन ठाणे स्थानकात सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आली. तेंव्हा ती ट्रेनमधील शौचालयात गेली. त्याचवेळी अभिनव देखिल तिच्या पाठोपाठ शौचालयात शिरला. तिथेच तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार करुन तो बाहेर आला. तशाच अवस्थेमध्ये नंतर तिने अभिनवबरोबर मनमाडपर्यंत प्रवास सुरू ठेवला. कहर म्हणजे, त्याने तिचे तिकीटही काढले नव्हते. मनमाडमध्ये तिकीट तपासणीसाने तिला हटकले, तेंव्हा तिला अभिनवने कोणतीच मदत न करता ‘तू पुढे जा मी येतोच,’ अशी बतावणी करीत तो तिथून निसटला. अखेर तिथूनच तिने आपल्या पालकांशी संपर्क साधून आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगाची तिने माहिती दिली. पालकांनी तिचा दंड भरुन तिला घरी आणले. नंतर तिने १२ फेब्रुवारी रोजी अभिनव विरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार मुंबईतील मालाड पोलीस ठाण्यात दाखल केली.*हीच तक्रार आता ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात वर्ग झाली असून मुलीवर ठाण्यातील पालिकेच्या एका रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ