शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे स्थानकात गर्दीमुळे तरुणी गुदमरली; तीन पुरुषही जखमी, मात्र नोंद नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 06:00 IST

ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.

ठाणे : मुंबई, ठाणे परिसरात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ठप्प झालेली ठाणे-मुंबई या मार्गावरील रेल्वेसेवा अद्याप सुरळीत झालेली नाही. त्यातच, रेल्वे प्रशासनाने बुधवारी रविवारचे वेळापत्रक जाहीर केल्याने प्रवाशांच्या हालात आणखी भर पडली.

ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे मुंब्य्राहून आलेल्या तरुणीला ठाण्यात उतरताच गुदमरून चक्कर आली. तिला आरपीएफ जवानांनी प्रथमोपचार केंद्रात नेले. तेथे उपचार करून तिच्या पालकांबरोबर तिला घरी पाठविण्यात आले. तर, मुंब्रा स्थानकात नाजमीन मोहम्मद इब्राहिम शेख (३६) ही महिला लोकलमधून पडून जखमी झाल्याची नोंद ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात झाली आहे. तसेच अन्य तिघे जखमी झाले; मात्र त्यांची नोंद नसल्याचे लोहमार्ग आणि आरपीएफ पोलिसांनी सांगितले.

ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या स्थानकांत येणाऱ्या गाड्या बुधवारी जवळपास अर्धा तास उशिराने येत होत्या. मुंब्रा-कळवा रेल्वे स्थानकांदरम्यान गर्दीमुळे चार प्रवासी पडून जखमी झाले. यामध्ये जखमी झालेल्या मुंब्य्रातील नाजमीन शेख यांच्या कंबरेला, हातपाय आणि मानेला दुखापत झाली. त्यांना ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. तर, नाजीर शेख हा तरुण गर्दीमुळे धावत्या लोकलमधून रुळांवर पडून त्याच्या पायाला दुखापत झाली.

निखिलेश कुबल हा तरुणही मुंब्रा-कळवादरम्यान पडला असून त्याच्या डोक्याला मार लागला. तर अन्य एका जखमी तरुणाचे नाव समजू शकले नाही. त्यांच्यावर उपचार करून घरी पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाण्यातील फलाट क्र मांक-४ आणि ६ वरील प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरपीएफ, जीआरपीएफ, होमगार्ड जवान तैनात करण्यात आले होते.नऊ विशेष गाड्या सीएसएमटीला रवानाठाण्यातून मुंबईकडे जाण्यासाठी गर्दी झाल्याने ठाणे रेल्वे प्रशासनाने सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ठाणे-सीएसएमटी सात आणि ठाणे-घाटकोपर दोन अशा नऊ विशेष गाड्या रवाना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. रविवारचे वेळापत्रक लागू केल्याने ठाण्यात १० ते १५ गाड्या रद्द झाल्याची माहिती ठाणे रेल्वे प्रशासनाने दिली.

गाड्या वाढविण्याची मागणीबुधवारी ठाणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शिल्पा सोनोने यांनी ठाणे रेल्वेस्थानक प्रबंधक आर. के. मीना यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण अशा अप आणि डाउन महिला विशेष गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी के ली.

टॅग्स :localलोकलthaneठाणेMumbai Localमुंबई लोकल