शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे कोपरी रेल्वे पुलाच्या गर्डरचे काम तात्काळ पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 23:40 IST

कोपरी रेल्वे पूलाच्या गर्डरचे काम तात्काळ पूर्ण करुन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात हा पूल वाहतूकीसाठी खुला करावा, असे निर्देश ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ठळक मुद्दे खासदार राजन विचारे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश चाकरमान्यांना करावा लागतो मोठया वाहतूक कोंडीचा सामना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबई अहमदाबाद पूर्व द्रूतगती राष्ट्रीय  महामार्गावरील कोपरी रेल्वे पूल हा अरु द असल्याने या ठिकाणी मुंबईकडे ये-जा करताना तसेच नाशिक अहमदाबादला जाणाºयांना मोठया वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर कोपरी रेल्वे पूलाच्या गर्डरचे काम तात्काळ पूर्ण करुन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात हा पूल वाहतूकीसाठी खुला करावा, असे निर्देश ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील अधिका-यांना दिले आहेत.ठाणे मुंबई मार्गावर कोपरी रेल्वे पुलाच्या कामामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. या पार्श्वभूमीवर या रेल्वे पूलाच्या कामाची पाहणी खासदार विचारे यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के तसेच शासकीय अधिका-यांसोबत बुधवारी केली. यामध्ये मध्य रेल्वे विभागाचे उपमुख्य अभियंता डी. डी. लोलगे, एमएमआरडीएचे अभियंता सुर्वे, महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. १९६५ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्कालीन जनगणनेनुसार रेल्वेच्या कोपरी पुलाचे बांधकाम केले होते. त्यानंतर खासदार विचारे यांना हा पूल धोकादायक झाल्याचे समजताच त्यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून तत्कालीन मुख्यमंत्र्याची भेट घेऊन या पुलाच्या बांधकामासाठी तसेच तसेच रेल्वे महाव्यवस्थापकांकडे पाठपुरावा केल्याने यासाठी नकाशांची मंजुरीही मिळाली. २४ एप्रिल २०१८ रोजी सुरू झालेल्या कोपरी पुलाचे बांधकाम मे २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे बंद पडलेले काम सुरू करण्यासही त्यांनी मंजुरी मिळवली होती.बुधवारी झालेल्या या पाहणी दौºयामध्ये विचारे यांनी ६५ मीटर लांबीच्या १४ गर्डर पैकी फेज एकच्या सात गर्डरचे काम डिसेंबर अखेरपर्यंत टाकण्याच्या सूचना रेल्वे अधिकाºयांना दिल्या. त्यावरील कॉंक्रि टीकरणाचे (स्लॅपचे) काम जानेवारीच्या अंतिम आठवड्यात पूर्ण करून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करावा. तसेच दुसºया टप्प्यातील फेज एकच्या पुढील गर्डर चे काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचनाही विचारे यांनी यावेळी अधिकाºयांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी