शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

पत्रीपुलाचे गर्डर मार्चअखेर बसवणार, एप्रिलमध्ये कल्याण डोंबिवलीकरांची कोंडीतून मुक्ती होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 20:42 IST

मध्य रेल्वेने नियोजनानुसार दोन ब्लॉक दिल्यानंतर गर्डर प्रत्यक्ष पत्रीपूलाच्या नियोजित जागी ठेवणे सोपे जाणार आहे.

डोंबिवली - पत्रीपुलाच्या गर्डरचे भाग येण्यास सोमवारपासून सुरुवात झाली असून, 7 टप्प्यांमध्ये हैदराबाद येथून कल्याणला टेलर कंटेनरमधून ते भाग येणार आहेत. सुमारे 8० मेट्रिक टन वजनांचे लोखंडी गर्डरचे भाग शहरात येत असल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरु होती. पहिला भाग आल्यावर सोशल मीडियावर नागरिकांनी गर्डर आले पण ते वेळेत जोडा आणि दिलासा द्या, अशी मागणी केली. सगळे भाग आल्यावर मार्च अखेरीस ते लावण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती एमएसएआरडीसीच्या अधिका-यांनी ‘लोकमत’ला दिली.मध्य रेल्वेने नियोजनानुसार दोन ब्लॉक दिल्यानंतर गर्डर प्रत्यक्ष पत्रीपूलाच्या नियोजित जागी ठेवणे सोपे जाणार आहे. त्यामुळे आता एकीकडे गर्डर येत असतांनाच दुसरीकडे रेल्वे ब्लॉक कधी, किती तासांचे देते यासंदर्भातही एमएसआरडीसीच्या यंत्रणोला पाठपुरावा करावा लागणार आहे. टेलरमधून गर्डरचे भाग आल्यानंतर ते कल्याणमध्ये प्रकल्पाच्या मोकळया जागेत ठेवण्यात येणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले. सगळे भाग आल्यानंतर त्यांचे एकत्रिकरण करून 75 आणि 35 अशा दोन टप्प्यात तांत्रिक काम करून ते जोडण्यात येतील. त्यानंतर आधी त्याची चाचणी होईल, आणि नंतरच प्रत्यक्ष पत्रीपूलाच्या नियोजित जागेत ते ठेवण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.सगळे भाग यायला सुमारे आठ ते दहा दिवस त्यानंतर पुढील तीन आठवडे जोडणीसाठी आणि त्यानंतर मार्च अखेरीस प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या एमएसआरडीसी, रेल्वे प्रशासन यांच्या नियोजनानुसार कोणताही अडथळा न येता काम झाल्यास पत्रिपुलाचे लोकार्पण ठरल्याप्रमाणे एप्रिलमध्ये होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नियोजनानुसार प्रकल्प बांधून लोकार्पण झाल्यास गेले दीड वर्ष पत्रीपुलावर तासन्तास वाहतूक कोंडीत अडकणा-या कल्याण डोंबिवलीच्या वाहनचालकांची सुटका होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली