शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील घोडबंदर रोड अखेर होणार वाहतूककोंडीमुक्त, राजन विचारे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 00:37 IST

Ghodbunder Road News :

ठाणे : ठामपाची हद्द संपते व मीरा भाईंदर मनपाची हद्द सुरू होते, त्या ठिकाणी अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत गायमुख घाट ते फाउंटन हॉटेलपर्यंत नव्याने होणाऱ्या उन्नत मार्गाची पाहणी मंगळवारी खासदार राजन विचारे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत केली.घोडबंदर मार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी टिकुजीनी वाडी ते बोरीवली या भुयारी मार्गाला गती देण्यासाठी २०१६ साली संसदेत विचारे यांनी मुद्दा उपस्थित केला होता. या कामाला वनखात्याची परवानगी न मिळाल्याने विलंब लागत होता. या प्रकल्पाच्या तसेच घोडबंदर रोडच्या वाहतूककोंडीवर काय उपाययोजना संबंधित विभागाकडून करण्यात आली आहे, असाही सवाल त्यांनी त्या वेळी केला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत तातडीने गायमुख ते फाउंटन हॉटेल असा ४ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्गाचा प्रस्ताव बनविण्यात आला. २४ नोव्हेंबर २०१७ रोजी ६६७ कोटींच्या सदर प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली.दरम्यान, मंगळवारी विचारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी व बैठक आयोजित करून या प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना केल्या. या प्रकल्पासाठी लागणारी वन खात्याची जागा अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी महिन्याभरात मिळवून देऊ, असे आश्वासन दिले. नवीन वर्षात या कामाची सुरुवात करू, असे विचारे यांनी सांगितले. या पाहणी दौऱ्याला आ. गीता जैन, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, नगरसेवक राजू भोईर, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहल सावंत,  लक्ष्मण जंगम, पप्पू भिसे, जयराम मेसे, ठाणे मनपाचे नगरसेवक नरेश मनेरा, सिद्धार्थ ओवळेकर व अधिकारी आदी उपस्थित होते. 

असा असेल प्रकल्प...अस्तित्वात असलेल्या २ २ रस्त्याचे रुंदीकरण करून रस्त्यात साडेसहा मीटर उंचीचे पिलर उभे करून त्यावर नवीन एलिव्हेटेड २ २ मार्ग बनविण्यात येणार आहे. त्यामुळे वर-खाली ४-४ अशा एकूण ८ लेनच्या मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहेत. टोलनाक्यामुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी ३ ३ अस्तित्वात असलेल्या मार्गिका ६ ६ करण्यात येणार आहेत. संपूर्ण प्रकल्प बीओटी तत्त्वावर असणार आहे. या रस्त्याची लांबी ४ कि.मी. असणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी