शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

घोडबंदरला यापुढे ‘ओसी’ नाही?; पाणीच नसल्याने आयुक्तांचा पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 07:38 IST

घोडबंदर भागाला आजही पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याची गंभीर बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.

ठाणे : घोडबंदर भागाला आजही पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याची गंभीर बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात वाढीव पाच एमलडी पाणी दिले जाईल. त्यानंतरही पाणीप्रश्न सुटला नाही, तर नव्या बांधकामांना कमतरता भासली; तर मात्र येथील बांधकामांना ओसी द्यायची की नाही, याचा गंभीरपणे विचार केला जाईल, अशी भूमिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मांडली.याशिवाय शहराला किती पाणी येते येते, किती पाणी नागरीकांना दिले जाते, पाण्याची चोरी, गळती किती आहे, यासंदर्भात पाण्याचे ऑडीट होणे अपेक्षित असतांना देखील त्याचे ऑडीट २००८ नंतर झालेच नसल्याची बाबही बुधवारी झालेल्या पाणी समस्येवरील जनसुनावणीत उघड झाली आहे.

पाण्याची समस्या सोडवण्यासाठी एक समिती स्थापन करून या समितीची महिन्यातून दोन वेळा बैठक घेण्याच्या अटीवर ठाण्यातील बांधकामांना परवानगी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये दिले होते. मात्र २०१७ साली स्थापन झालेल्या या तक्रार निवारण समितीच्या पाच वर्षात केवळ दोन बैठका झाल्या. यावेळी दक्ष नागरिक चंद्रहास तावडे यांनी शहरात पाण्याची समस्या असतांना त्याचे नियोजन कसे केले जाते, किती पाणी येते, किती पाणी ठाणेकरांना दिले जाते. पाण्याचा अपव्यय किती होतो, याची माहिती कशी मिळविली जाते. त्यासाठी पाण्याचे ऑडिट महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केले जाते का? असा सवाल केला. मात्र २००८ नंतर पाण्याचे ऑडिट झाले नसल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आयुक्त बांगर यांनी यापुढे दरवर्षी पाण्याचे ऑडिट करण्याचे आदेश दिले. 

पाणी नसतानाही नव्याने बांधकाम

घोडबंदर भागात काही ठिकाणी पाण्याची आजही बोंब आहे. येथील गृहसंकुलांना दरमहा टँकरसाठी पाच ते सात लाखांचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे वास्तव स्थानिक रहिवासी उदय श्रृंगारपुरे यांनी निदर्शनास आणले. पाण्याची समस्या सुटण्यासाठी २०१३ पासून प्रयत्न केले जात आहेत, मात्र अद्यापही पाण्याची समस्या सुटलेली नाही. पाणी नसतानाही या भागात नव्याने बांधकामे उभी होत आहेत, आधीच्या रहिवाशांना पाणी मिळत नसल्याने नवीन लोकांना पाणी कसे मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :thaneठाणे