शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शाळा खाजगी संस्थेला देण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:37 IST

विद्यार्थी संख्येअभावी मराठी शाळांना घरघर लागली असताना पटसंख्या चांगली असतानाही केडीएमसीची मोहने येथील शांताराम महादु पाटील ही शाळा खाजगी संस्थेला चालवण्यास देण्याचा

कल्याण : विद्यार्थी संख्येअभावी मराठी शाळांना घरघर लागली असताना पटसंख्या चांगली असतानाही केडीएमसीची मोहने येथील शांताराम महादु पाटील ही शाळा खाजगी संस्थेला चालवण्यास देण्याचा घाट प्रशासनाकडून घालण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक कडोंमपा या शिक्षकांच्या संघटनेने या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे.केडीएमसीच्या आजच्याघडीला ६४ शाळा आहेत. यामधील काही शाळांचा विद्यार्थीपट समाधानकारक नसला तरी काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या चांगली आहे. आता त्या शाळा देखील खाजगी संस्थांना भाडेतत्वावर चालवायला दिल्या जाऊ लागल्या आहेत.मोहने येथील शाळेचा पट ८० च्या आसपास असतानाही यशोदीप शिक्षण संस्थेला शाळा चालवायला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असल्याचे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र सोनजे यांनी सांगितले. यशोदीप संस्थेला खाजगी वर्ग शाळेत चालवण्याची परवानगी देण्यात आली होती.परंतु आता संपूर्ण शाळाच त्यांना चालवायला देण्याचा घाट घालणे म्हणजे गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान असल्याचे शिक्षक संघटनेचे सचिव निलेश वाबळे यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने खाजगी संस्थेच्या दावणीला महापालिकेची शाळा बांधली तर शिक्षक १५ जूनला शाळा उघडणार नाहीत. त्याचबरोबर महापालिकेचे सव्वातीनशे शिक्षक तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा कार्याध्यक्ष भगवान हमरे यांनी दिला.यासंदर्भात आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे शिक्षक संघटनेनी ‘लोकमत’ला सांगितले. या महापालिका शाळेच्या बाजुला असलेली आश्रमशाळा पंढरपूरला स्थलांतरीत झाल्याने तेथील विद्यार्थी महापालिकेच्या शाळेत समाविष्ट झाले तर पट अधिकच वाढणार असल्याचे शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे.