शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

लग्न लागण्यापूर्वी मंडपात तहसीलदार, पोलीस पोहोचले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 12:49 AM

कसाऱ्यात लग्न लागण्यापूर्वी मंडपात पोलीस कर्मचारी पोहोचले

- श्याम धुमाळ कसारा : सोमवारी जोरदार तेला (हळद पार्टी) झाली. मंगळवारी सकाळी हळद लागली. सकाळी १० नंतर लग्नाची लगबग सुरू झाली. दुपारी १२ वाजण्याच्या जवळपास एक लग्न व दुपारी ३ वाजता दुसरे, असे दोन लग्न सोहळे मोखवणे येथे होते. यादरम्यान दोनपैकी एक विवाह हा अल्पवयीन जोडप्याचा होता. १२ वर्षांची चिमुरडी आणि १८ वर्षांच्या मुलाचा हा विवाह होता. परंतु, या बालविवाहाची माहिती शहापूरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी आणि ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांना होताच, त्यांनी यंत्रणेच्या मदतीने हा बालविवाह रोखला.अधिकाऱ्यांनी विवाहस्थळ गाठले, तेव्हा एका अल्पवयीन मुलीला हळद लावून डोक्याला बाशिंग बांधून लग्नमंडपात आणण्याची तयारी सुरू होती. इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या या चिमुरडीचे गावातीलच एका १७-१८ वर्षांच्या मुलाशी लग्न लागणार होते. मात्र, विवाहस्थळी पोलीस व अन्य लोक आल्याने मांडवातील वऱ्हाडी व मुलामुलीच्या घरच्यांनी एकच गोंधळ घातला. समयसूचकता दाखवून अधिकाऱ्यांनी सर्वांना शांत केले. स्थानिक महिला बचत गटाच्या सदस्य तसेच शिक्षकांना सोबत घेऊन मुलीच्या पालकांचे समुपदेशन केले. मात्र, परिस्थितीने घायाळ असलेल्या पालकांनी आपल्या गरिबीचे व आजाराचे भीषण वास्तव मांडले. यावर अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करत तोडगा काढला. यावर चिमुरडीच्या पालकांनी सहमती दर्शवली. त्यानंतर सर्वांना तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांच्याकडे आणण्यात आले. त्यांची समजूत काढत शिक्षणाचे महत्त्व व बालविवाहाचे दुष्परिणाम याची माहिती त्यांना देण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार मेंगाळ व महिला दक्षता समितीच्या सदस्या उपस्थित होत्या. कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक के.बी. केंद्रे, मंडळ अधिकारी चौधरी, तलाठी भरत गांजवे, ग्रामविकास अधिकारी पाकळे यांच्यासह पोलीस पाटील पांडुरंग भोईर यांनी ही परिस्थिती हाताळली.बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. बालविवाहामुळे मातामृत्यू, बालमृत्यू, कुपोषण यासारखे प्रकार पुढे येत आहेत. बालविवाह रोखण्यासाठी त्रास झाला असला तरी, समुपदेशनामुळे चिमुरडीचे पालक तिला उच्च शिक्षण देण्यास तयार झाले.- नीलिमा सूर्यवंशी, तहसीलदार, शहापूरमाझ्या डोळ्यांदेखत लगीन होऊ द्या...साहेब, माझ्या मुलीचे लगीन माझ्या डोळ्यांदेखत होऊ द्या. मला आजार आहे. आम्ही वीटभट्टीवर काम करतो. लग्नासाठी व्याजाने पैसे काढलेत साहेब, असे वास्तव वधूपित्याने अधिकाºयांसमोर मांडले. मात्र, अधिकाºयांनी याचे दुष्परिणाम सांगितल्यानंतर मुलीला शाळा शिकवण्याचा संकल्प या पित्याने सोडला.