शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी घ्या, शहर विद्रूप करा; होर्डिंग्जसह कमानींचा शहरांना विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 06:08 IST

पुण्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर आला असून या पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवली शहरांतील स्थितीही फारशी वेगळी नसल्याचे चित्र दिसत आहे. अधिकृत-अनधिकृत होर्डिंग्ज आणि कमानींचा विळखा कल्याण, डोंबिवली शहरांना पडला आहे.

- प्रशांत मानेकल्याण : पुण्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर आला असून या पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवली शहरांतील स्थितीही फारशी वेगळी नसल्याचे चित्र दिसत आहे. अधिकृत-अनधिकृत होर्डिंग्ज आणि कमानींचा विळखा कल्याण, डोंबिवली शहरांना पडला आहे.होर्डिंग्जसाठी परवानगी असली तरी, त्यामुळे होणारे शहराचे विद्रूपीकरण आणि वाहतूककोंडीकडे कानाडोळा केला जात आहे. ‘परवानगी घ्या आणि शहर विद्रुप करा’ असेच काहीसे धोरण केडीएमसीने स्वीकारले आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे. पुण्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर इतर महापालिका सावध झाल्या आहेत. केडीएमसीला अद्याप जाग आलेली नाही. कल्याण, डोंबिवलीत ठिकठिकाणी लोखंडी होर्डिंग्ज उभारण्यात आली आहेत. यात अधिकृत किती, हा संशोधनाचा विषय आहे. शहरात वाटेल तिथे फुकटात होर्डिंग्ज लावण्याची जणू स्पर्धाच पाहायला मिळत आहे. आता नवरात्रोत्सव मंडळांच्या कमानींचीही भर पडत आहे. किमान दिवाळीपर्यंत या कमानी जैसे थे राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नवाढीसाठी शहर विद्रूप करण्याची परवानगी महापालिकेकडूनच दिली जात असल्याने प्रशासनही शहर विद्रूपीकरणास तितकेच जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.प्रभागांमध्ये स्थापन केलेल्या विशेष समित्याही ठरल्या निरुपयोगीमहापालिकेचे माजी आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या कार्यकाळात न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक प्रभागक्षेत्रात विशेष समिती गठीत करण्यात आली होती.अनधिकृत होर्डिंग्जबाबतचा समितीने दिलेला अहवाल न्यायालयात सादर केला जायचा. या समितीत अधिकाऱ्यांसह शहरातील तज्ज्ञ मंडळी आणि पत्रकारांचाही समावेश होता. सुरुवातीला समितीच्या एकदोन बैठका झाल्या.कालांतराने या समितीची एकही बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे केवळ न्यायालयाला दाखवण्यासाठी ही समिती गठीत केली होती का आणि आता ती विसर्जित केली का, असे सवाल उपस्थित होत आहेत.आयुक्त, उपायुक्तांकडूनप्रतिसाद नाहीहोर्डिंग्जच्या मुद्यावर लोकमतने आयुक्त गोविंद बोडके आणि मालमत्ता विभागाचे उपायुक्त अमित पंडित यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही अधिकाºयांकडून प्रतिसाद मिळाला नाही.हेल्पलाइनवर तक्रारी नाहीअनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर व फलकांविरोधातील कारवाईसाठी केडीएमसीने दिलेल्या हेल्पलाइनवर फारशा तक्रारी येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या हेल्पलाइनवर लोकमतने संपर्क साधला असता महिन्यातून केवळ एकदोनच तक्रारी येत असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. महत्त्वाचे चौक, बसथांबे आणि अन्य ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट आहे.त्याविरोधात हेल्पलाइनसारखा तक्रारीचा सोपा मार्ग उपलब्ध असताना त्याचा प्रभावी वापर होत नाही. शहर विद्रूपीकरणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर कारवाई सुरू केल्याचा दावा करत महापालिकेने १८००२३३४३९२ हा हेल्पलाइन क्रमांक जाहीर करून तक्रार करण्याचे आवाहन केले होते.

टॅग्स :kalyanकल्याण