शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पडघ्यातून ६० टन अवैध लाकूडसाठा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:58 IST

भिवंडी तालुक्यातील पडघानजीकच्या वनक्षेत्रामध्ये वनविभागाने शनिवारी धडक मोहीम राबवली.

ठाणे : भिवंडी तालुक्यातील पडघानजीकच्या वनक्षेत्रामध्ये वनविभागाने शनिवारी धडक मोहीम राबवली. १२ तास अखंड शोधमोहीम राबवून वनविभागाने जवळपास ६० लाकडांचा अवैध साठा हस्तगत केला. येथे अवैधरीत्या सुरू असलेली एक आरा मशीनही वनअधिकाऱ्यांनी हस्तगत केली.पडघा परिसरात काही लाकूडमाफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. आदिवासी लोकांना हाताशी धरून त्यांच्याकडून लाकडाची अवैध कत्तल करून घेतात. त्यासाठी वनपरिसरातील गावागावांत लाकूडमाफियांचे हस्तक कार्यरत आहेत. आदिवासींनी आणलेले खैर आणि सागवान जातीचे लाकूड हे माफिया ५ ते ६ रुपये प्रतिकिलो भावाने विकत घेतात. लाकडाचा आवश्यक तेवढा साठा झाला की, त्याची अवैध वाहतूक केली जाते. चोरीचे हे लाकूड मुख्यत्वे चिपळूणकडे पाठवले जाते. चिपळूणला काथाच्या अवैध भट्ट्या मोठ्या प्रमाणात आहेत. काथ बनवण्यासाठी खैर जातीचे लाकूड वापरले जाते. आदिवासींकडून कवडीमोल घेतलेले लाकूड त्यांना दामदुप्पट विकले जाते.झाडांची कत्तल करून मोठ्या प्रमाणात माया गोळा करणाºया या लाकूडमाफियांवर वनविभागाने शनिवारी जोरदार कारवाई केली. वनअधिकारी आणि कर्मचाºयांच्या ताफ्याने पडघ्यातील राहूर आणि बोरिवली गावात शनिवारी सकाळी ६ वाजता धडक दिली. आदिवासींकडून घेतलेल्या लाकडाचा साठा हस्तगत करण्यासाठी वनकर्मचाºयांनी दोन्ही गावे पिंजून काढली. दोन्ही गावांमधून जवळपास ३० टन सागवान आणि तेवढेच खैर जातीचे लाकूड यावेळी हस्तगत करण्यात आले. लाकडाच्या अवैध वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहनेही यावेळी हस्तगत करण्यात आली. राहूर येथे शोधमोहीम सुरू असताना वनअधिकाºयांना एका घराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेमध्ये अनधिकृतरीत्या आरा मशीन सुरू असल्याचे निदर्शनास आले. ही संपूर्ण मशीन उचकटून जप्त केली असल्याची माहिती वनअधिकाºयांनी दिली. या कारवाईमध्ये ठाण्याचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, विभागीय वनअधिकारी सचिन कंद, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे, दिलीप देशमुख, शांताराम वार्इंदे, वनपाल अर्जुन निचिते यांच्यासह इतर वनअधिकारी, वनपाल आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. ही मोहीम रात्री ८ च्या सुमारास सुरक्षेच्या कारणास्तव थांबवण्यात आली. मात्र, मोहीम संपली नसून कारवाई सुरूच राहणार असल्याचे वनअधिकाºयांनी सांगितले.