शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मीरा- भाईंदर महापालिकेची महासभा अखेर ऑनलाईनच होणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 22:30 IST

कोरोना संसर्गाचा ओमायक्रोन या आफ्रिकी व्हेरियंटच्या येण्याने १ डिसेंबर रोजी ऑफलाईन आयोजित केलेली महासभा ही अचानक ओनलाईन घेण्यात आली होती.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेची महासभा उद्या २४ डिसेंबर रोजी अखेर ऑनलाइनच होणार आहे . विशेष म्हणजे १ डिसेंबर रोजीची महासभा हि ऑफलाईन घ्या म्हणून तहकूब करणाऱ्या महापौरांनीच ऑनलाईन सभा घेण्यास मंजुरी दिली आहे . तर आयुक्तांनी शासना कडून ऑफलाईन सभे बाबत मागवलेले मार्गदर्शन अजून आलेले नाही त्यामुळे ऑफलाईन सभा घेण्यावरून नगरसेवक बॅकफूटवर आल्याचे मानले जाते . 

कोरोना संसर्गाचा ओमायक्रोन ह्या आफ्रिकी व्हेरियंटच्या येण्याने १ डिसेंबर रोजी ऑफलाईन आयोजित केलेली महासभा ही अचानक ओनलाईन घेण्यात आली होती. त्या ऑनलाईन सभेत सत्ताधारी भाजपा सह शिवसेना , काँग्रेसच्या नगरसेवकांनी देखील ऑफलाईन सभा घेण्यास सहमती दर्शवली होती . ऑनलाईन सभेत नगरसेवकांना आणि त्यातही विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना बोलू दिले जात नाही असा आरोप सातत्याने होत होता . विरोधीच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील नगरसेवकां मध्ये देखील महासभेत बोलायला मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत होती . ऑनलाईन महासभेत मत मोजणीत गैरप्रकार होत असल्याचे आरोप होत होते . कारण नगरसेवकांचे मत न घेता गटनेत्याने सांगितले त्या संख्ये नुसार मतदान घेतले जात असल्याने ते नियमाला धरून नसल्याचे आरोप झाले . 

दरम्यान  १ डिसेंबर रोजी ऑनलाईन महासभेत सत्ताधारी भाजपा सह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी ऑफलाईन महासभेची मागणी केली . ऑफलाईन महासभेसाठी पुरेशी पर्यायी जागा बघावी अशी भूमिका घेत महासभा तहकूब करण्यात आली होती . ऑफलाईन सभेवरून प्रशासना विरुद्धच्या आक्रमक भूमिके नंतर  आयुक्त दिलीप ढोले यांनी देखील ऑफलाईन महासभा खाजगी जागेत घ्या बाबत राज्याच्या नगरविकास विभाग कडे पत्र पाठवून मार्गदर्शन मागवले होते.

यापूर्वी खाजगी जागेतमहासभा व इतर सभा घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे खाजगी जागेत महासभा घेणे खर्चिक ठरेलच शिवाय ते नियमा नुसार ठरेल कि नाही ? या बाबत मार्गदर्शन करण्याची विनंती प्रधान सचिवांना केली होती . कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरियंट मुळे फक्त ऑनलाईन महासभा, स्थायी समिती सभा घेणे योग्य होईल अशी भूमिका देखील आयुक्तांनी स्पष्ट केली होती . 

शासनाकडून महासभा ऑनलाईन किंवा ऑफलाईन  घ्या बाबत अजून मार्गदर्शन आलेले नसले तरी १ डिसेंबर रोजी तहकूब केलेली महासभा शेवटी ऑनलाईन घेण्यावर महापौरांसह सत्ताधारी आणि विरोधकांनी सहमती दर्शवत ऑफलाईन सभा घेण्यावरून बॅकफूटवर आल्याचे मानले जात आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर