भिवंडी मनपाच्या महासभेत विरोधीपक्षानेमहापौरांना दिला कमरपट्ट्यासह बाम भेटभिवंडी: शहरात असलेल्या मोठमोठ्या खड्ड््यातून प्रवास करताना होणाऱ्या आजारापासून स्वत:ला वाचविण्यासाठी विरोधीपक्ष नेता श्याम अग्रवाल यांनी महापौर जावेद दळवी यांना कमरपट्टा व बाम भेट देऊन प्रतिकात्मक निषेध करीत खड्डे बुजविण्याची मागणी केली. महासभेत घडलेल्या या घटनेची दखल नगरसेवकांनी व प्रशासनाने घेतली तर शहरात आज दिवसभर हा चर्चेचा विषय बनला होता. शहरात पाऊस पडल्यानंतर शहरातील सर्व ठिकाणी लहान-मोठ्या रस्त्यात खड्डे झालेत. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते आहेत अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने तेथे अर्धा-एक फुट खड्डा झाला होता. रस्त्यातील खड्ड्याच्या उंचीमुळे काही ठिकाणी छोटे-मोठे अपघात होऊन नागरिक जखमी झाले होते.तर अनेकांना कमरदुखीचा तर काहींना मणक्याचा त्रास भोगावा लागला. तसेच काही जेष्ठ नागरिक गुढघ्यांच्या त्रासांनी हैराण झाले. रस्ते दुरूस्तीसाठी शहरात विविध आंदोलने झाली.मात्र सत्ताधा-यांनी प्रशासनाकडून खड्डे बुजविण्याची धमक दाखविली नाही. त्याचे पडसाद काल सोमवार रोजी महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या महासभेत उमटले. या खड्ड्यापासून महापौर देखील वाचणार नाहीत. त्यामुळे महासभे दरम्यान महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेता श्याम अग्रवाल,नगरसेवक संतोष शेट्टी व गटनेता निलेश चौधरी यांनी मिळून कमरेचा पट्टा व बाम अशी सामुग्री महापौर जावेद दळवी यांना देत त्यांनी शहरातील खड्ड्याकडे त्यांचे लक्ष वेधले. या घटनेचे महासभेतील नगरसेवकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले आणि विरोधीपक्ष नेत्याने केलेल्या उपरोधीक कार्याचे स्वागत केले. हा विषय शहरात मोठ्या रंजकतेने नागरिकांमध्ये चर्चीला गेला.
भिवंडी मनपाच्या महासभेत विरोधीपक्षाने महापौरांना दिला कमरपट्ट्यासह बाम भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:33 IST
भिवंडी मनपाच्या महासभेत विरोधीपक्षानेमहापौरांना दिला कमरपट्ट्यासह बाम भेटभिवंडी : शहरात असलेल्या मोठमोठ्या खड्ड््यातून प्रवास करताना होणाऱ्या आजारापासून स्वत:ला वाचविण्यासाठी विरोधीपक्ष नेता श्याम अग्रवाल यांनी महापौर जावेद दळवी यांना कमरपट्टा व बाम भेट देऊन प्रतिकात्मक निषेध करीत खड्डे बुजविण्याची मागणी केली. महासभेत घडलेल्या या घटनेची दखल नगरसेवकांनी व प्रशासनाने घेतली तर ...
भिवंडी मनपाच्या महासभेत विरोधीपक्षाने महापौरांना दिला कमरपट्ट्यासह बाम भेट
ठळक मुद्देखड्ड््यातून प्रवास करताना आजारापासून वाचविण्यासाठी महापौरांना भेट विरोधी पक्षाने महासभेत महापौरांना कमरपट्टा व बाम दिला भेटउपरोधीक भेट वस्तू दिल्याचे नगरसेवकांकडून स्वागत