शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

लिंगभिन्नता प्रगतीच्या मार्गातील अडसर नाही- न्या. थूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 19:35 IST

महिलांचा हक्क या विषय बोलताना न्या. थूळ यांनी शबरीमल मंदिर प्रवेशाबाबतचा उल्लेखही ओझरता केला. जगातील अनेक देशांमध्ये महिलाना समान वेतन, मतदान हक्क, बाळातपणाची रजा कामाचे तास, साप्ताहीक सुटी आदींसाठी मोठा संघर्ष करावा लागला. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात भारतीय महिलाना मतदानाचा हक्क, शिक्षणाचा अधिकार, स्त्री- पुरूष समानता, व्यक्ती स्वातंत्र्य असे अनेक अधिकार दिले

ठळक मुद्देसन १९१०च्या अंतरराष्ट्रीय  महिला परिषदेत मांडलेल्या सुचनेनुसार जागतिक महिला दिनसर्वप्रथम २८ फेब्रुवारी महिला दिन साजरा होत असे

ठाणे : प्रत्येकाला स्वत:ची प्रगती करण्याचा पूर्ण अधिकार आहे. लिंगभिन्नता हा प्रगतीच्या मार्गात अडसर होऊ शकत नाही. लिंग समानता असलीच पाहिजे. महिलांनी स्वत:ला प्रयत्नपूर्वक घडवावे. राष्ट्राच्या उभारणीत सक्रिय सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा राज्याचे एससी, एसटी आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रभान थूळ यांनी केली.सावित्रीबाई फुले बालवाडी, रामभाऊ भिसे बालविकास मंदिर आणि रतनबुवा पाटील माध्यमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली येथील लोढा हेवन, निळजे येथे शनिवारी महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असताना न्या. थूळ यांनी महिलाना मार्गदर्शन केले. सन १९१०च्या अंतरराष्ट्रीय  महिला परिषदेत मांडलेल्या सुचनेनुसार जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. सर्वप्रथम २८ फेब्रुवारी महिला दिन साजरा होत असे, त्यानंतर युनोने ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले, असेही न्या. थूळ यांनी सांगितले. या कार्यक्रमास त्यांच्या प्रमुख उपस्थितीसह जनसंपर्क अधिकारी रमेश शिंदे, संस्थेच्या अध्यक्षा सुलभा कांबळे, सचिव डॉ. रोहन कांबळे कार्यकारी अधिकारी प्रतिक्षा गमरे आदींसह महिला वर्ग मोठ्यासंख्येने उपस्थित होता.महिलांचा हक्क या विषय बोलताना न्या. थूळ यांनी शबरीमल मंदिर प्रवेशाबाबतचा उल्लेखही ओझरता केला. जगातील अनेक देशांमध्ये महिलाना समान वेतन, मतदान हक्क, बाळातपणाची रजा कामाचे तास, साप्ताहीक सुटी आदींसाठी मोठा संघर्ष करावा लागला. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात भारतीय महिलाना मतदानाचा हक्क, शिक्षणाचा अधिकार, स्त्री- पुरूष समानता, व्यक्ती स्वातंत्र्य असे अनेक अधिकार दिले. म्हणून महिला पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष अशी महत्त्वाची पद भूषविताना दिसत असल्याचे न्या. थूळ यांना सांगितले. यावेळी विविध क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या महिला सत्कारही न्या. थूळ यांच्या हस्ते करण्यात आला. स्त्रीयांनी अन्याय सहन करू नये, त्याचा प्रतिकार करावा, गुलामगिरीत राहू नयो, स्त्रीया गुलाम झाल्यास कुटुंब देखील गुलाम होईल. यावेळीच पायबंद घालण्यासाठी महिलांनी स्वाभिमानाने जीवन जगावे, स्वत:शी स्पर्धा करण्याचे धाडस अध्यक्षा सुलभा कांबळे यांनी महिला दिले.

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवली