शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

ठाण्यातील संगीत कट्टयावर गीता दत्त यांच्या आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 15:52 IST

ठाणे शहरातील गायक, गीतकार, संगीतकार, वादक यांना हक्काचं व्यासपीठ म्हणून संगीत कट्टा महत्वाचे माध्यम ठरत आहे.

ठळक मुद्देसंगीत कट्टयावर गीता दत्त यांच्या आठवणींना उजाळा"कोई दूर से आवाज दे" या कार्यक्रमाचे आयोजन गीता दत्त यांची अजरामर गाणी ऑडिओ विजुवलद्वारे सादर

ठाणे : संगीत कट्टयावर सातत्याने नवनवीन प्रयोग घडत आहेत. यावेळी संगीत कट्टयावर स्वर-साज प्रस्तुत स्व.गीता दत्त यांच्या गीतावर आधारित "कोई दूर से आवाज दे" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा हा २४ क्रं चा कट्टा होता.

संगीत कट्ट्यावर हा कार्यक्रम सादर झाला व या कार्यक्रमास प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. यात गीता दत्त यांची अजरामर गाणी ऑडिओ विजुवल द्वारे सादर करण्यात आली. गीताजींच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.  एस.डी बर्मन व ओपी नय्यर यांच्या गीतांचा प्रभाव गीताजींवर होता. एस.डी बर्मन यांनी केलेले नवनवीन प्रयोग व आणि गीताजींनी त्या गाण्यांना दिलेला न्याय सादरीकरणातुन सांगण्यात आला.तसेच गीताजींनी विविध संगीतकारांसोबत गायलेली गाणी या कार्यक्रमात सादर करण्यात आली.  वसंत देसाई ते हेमंत कुमार,तिमिर बरन,सलील चौधरी,कनू रॉय यांच्या सोबतची गीताजींची गाणी आज ही लक्ष्यात राहतात.तसेच गुरुदत्त आणि ओपी नय्यर यांना यशाच्या शिखरावर नेण्यात गीता दत्त यांचा फार मोलाचा वाटा होता याची आठवण कार्यक्रमाच्या निवेदिका अर्चना वैद्य यांनी करून दिली. वैद्य यांनी निवेदनाच्या माध्यमातून गीताजींचा प्रवास आपल्या समोर मांडला. कमलेश सुतवाणी यांच्यावर या कार्यक्रमाच्या संकलनाची जबाबदारी होती.त्यांनी ती उत्तमरीत्या पार पाडली.यावेळी दीपप्रज्वलन जेष्ठ प्रेक्षक माधुरी गद्रे यांनी केले. चुपकेसे मिले,  मेरा नाम, दिवाना मस्ताना, मेरी जान, कोई दूर से आवाज दो हि गाणी यावेळी  सादर करण्यात आली. मेरा नाम या गाण्यासाठी प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्या चा कडकडाट केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही खरंच गीताजींच्या काळात रमलो. संगीत कट्ट्यामार्फत असे नवनवीन प्रयोग सातत्याने होवोत अशी भावना एका ज्येष्ठ प्रेक्षकाने व्यक्त केली.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकmusicसंगीत