शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील गायत्रीनगर तणावाखालीच

By admin | Updated: October 14, 2016 06:32 IST

मोहरमच्या मिरवणुकीवेळी भिवंडीत बुधवारी निर्माण झालेला तणाव, कमानी तोडण्याची घटना आणि दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी गुरूवारी दिवसभरात

भिवंडी : मोहरमच्या मिरवणुकीवेळी भिवंडीत बुधवारी निर्माण झालेला तणाव, कमानी तोडण्याची घटना आणि दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी गुरूवारी दिवसभरात ३६ जणांची धरपकड केली. रात्री उशिरापर्यंत हे सत्र सुरू होते. आधी कमानी उभारू देण्याबाबत कोणताच आक्षेप न घेणाऱ्या पोलीस आणि प्रशासनाने या तणावानंतर कमान उभारणाऱ्यांविरोधातही गुन्हे दाखल केले. शांतता कमिटीच्या बैठकीनंतरही तणाव कमी न झाल्याने गायत्रीनगर, रामनगर भागात दुसऱ्या दिवशी घबराटीचे वातावरण होते.दोन गटातील दगडफेक, पोलिसांच्या लाठीहल्ल्यानंतर शांतीनगर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या घटनांनुसार चार गुन्हे दाखल झाले आहेत. रामनगर भागातील मन्सूरबाग व फातमानगरमधील ताबुतांची मिरवणूक काढल्यावर ते ठंडा (दफन) करण्यासाठी चिस्तीया मशिदीकडे नेले जातात. ती मिरवणूक गायत्रीनगरच्या सिध्देश्वर श्ांकर मंदिरासमोर आली असता मिरवणुकीतील जमावाने मंदिरावर दगडफेक केली. चपला फेकून धार्मिक भावनांचा अपमान होणारे कृत्य केले. पोलिसांवर दगडफेक केली. नवरात्रोत्सवासाठी उभारलेल्या स्वागत कमानी तोडल्याने त्यावरील दुर्गादेवीचे चित्र असलेले बॅनर जमिनीवर पडून पायदळी तुडवले गेले. त्यातून धार्मिक भावनांचा अपमान झाल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे जमावाची पळापळ सुरू झाली. दहशत पसरली. घरेदारे, दुकाने बंद झाली. या घटनेला जबाबदार असलेले गुलशन इद्रीस फारूकी, सोनु काल्या, त्याची आई, समीम डोसावाला, रफीक बंदेनवाज शेख, अफरोज मोहम्मद सिध्दिकी, फैयाज जाफर खान, मोहम्मद अफरार शेख अशा १२ जणांसह ५० ते ६० जणांच्या जमावाविरोधात शांतीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चिस्तीया मशिदीकडून मिरवणुकीतील जमाव फातमानगरकडे परतत असताना त्यांच्यावर चपला व दगडफेक केल्याप्रकरणी नवनाथ माने, दादासाहेब कव्हर व त्यांच्यासोबतच्या जमावाविरोधातही गुन्हा नोंदवला. गायत्रीनगर हनुमान मंदिरासमोर सार्वजनिक मार्गावर स्वागत कमानी उभारल्याप्रकरणी दीपक ठाणेकर, विकास निकम, शरद धुळे यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)