शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पीठासीन अधिकारी नेमणुकीचे गौडबंगाल; १० दिवस उलटूनही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 00:25 IST

केडीएमटी सभापती निवड : केडीएमसीत विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे परिवहन समितीमधील बलाबल पाहता या निवडणुकीत त्यांचे पारडे जड आहे

कल्याण : कोरोनामुळे लांबणीवर पडलेली परिवहन सभापतीपदाची निवडणूक जुलैमध्ये होणार होती. परंतु, ती ऐनवेळी रद्द झाली. आता पुन्हा नव्याने आदेश जारी झाल्यानंतर या निवडणुकीसाठी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांची पीठासीन अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. या नेमणुकीला १० दिवसांहून अधिक कालावधीत लोटूनही अद्याप निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही.

परिवहन सभापती मनोज चौधरी यांचा एक वर्षाचा कार्यकाळ मार्चमध्ये संपला. परंतु, कोरोनामुळे सभापतीपदाची निवडणूक होऊ शकली नाही. परिणामी, चौधरी यांना मुदतवाढ मिळाली आहे. जुलैमध्ये ही रखडलेली निवडणूक ऑनलाइन प्रक्रियेद्वारे होणार होती. त्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून तत्कालीन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची नियुक्तीही झाली होती. परंतु, जुलैअखेरीस कोकण विभागीय आयुक्तांनी काढलेल्या आदेशाद्वारे ही निवडणूक रद्द करण्यात आली. दरम्यान, पुन्हा सभापतीपदाची निवडणूक ऑनलाइनद्वारे घेण्याबाबत नव्याने आदेश जारी झाल्याने कोकण आयुक्तांनी निवडणुकीसाठी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. गुरसळ यांची पीठासीन अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. सभापतीपद निवडणुकीचा कार्यक्रम मागील आठवडय़ात जाहीर होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त होते. परंतु, अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

केडीएमसीत विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे परिवहन समितीमधील बलाबल पाहता या निवडणुकीत त्यांचे पारडे जड आहे. त्यामुळे या पदासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीत भाजपमधील कोणाला सभापतीपदी संधी मिळते? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. मात्र, या निवडणुकीला होत असलेला विलंब आश्चर्यजनक आहे. जुलैमध्ये निवडणूक रद्द झाल्यानंतर भाजपच्या सदस्यांनी निवडणूक घ्या, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा आक्रमक पवित्र घेतला होता. परंतु, आता निवडणुकीची तारीख जाहीर होण्यास विलंब लागत असतानाही त्यांनी बाळगलेले मौन चर्चेचा विषय ठरले आहे.आयुक्त, सचिवांशी करणार चर्चायासंदर्भात भाजपचे परिवहन सदस्य संजय मोरे यांनी लवकरच सचिव आणि आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले. निवडणुकीसाठी नेमलेले पीठासीन अधिकारी गुरसळ यांनाही पत्रव्यवहार करून तारीख लवकर जाहीर करण्याची मागणी केली जाईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाBJPभाजपा