शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

...अन् तळीरामांचा गटारीचा प्लान फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 17:23 IST

गटारी साजरी करण्याच्या योजनांवर पाणी

ठाणे: दारू पिण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाणाऱ्या तळीरामांवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वॉच ठेवला आहे. वनात जाणाऱ्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला असून वनात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. येऊरमध्ये असलेल्या सर्व प्रवेशाच्या ठिकाणी सहा तुकड्यांमध्ये ४२ कर्मचाऱ्यांचा पहारा ठेवण्यात आला होता.बुधवारी  गटारी (दर्श) अमावस्या असल्याने तळीराम आणि मांसाहार करणाऱ्यांची सर्वत्र पार्ट्या होत असताना येऊर (ठाणे) येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मात्र असे दृश्य दिसून आले नाही. पावसाचा मोसम आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखे जंगल असल्याने या ठिकाणी पार्ट्या करण्याची योजना अनेक तरुण आणि तळीरामांनी आखल्या होत्या. मात्र वन वन विभाग आणि पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे त्यांना पार्ट्यांचा बेत पूर्ण करता आला नाही. ठाणे पोलिसांनी येऊरच्या मानवी वसाहतींमध्ये नाक्यांनाक्यावर चोख बंदोबस्त ठेवला होता. तर वन विभागात जाणाऱ्या पॉइंटवर वन विभागाने ६ तुकड्या बनवून ४२ कर्मचारी-अधिकाऱ्यांमार्फत बंदोबस्त ठेवला होता. एकालाही वनात जाऊ दिले जात नव्हते. त्यामुळे बुधवारी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान वनात जाण्यास मनाई असतानाही अनेक उत्साही तरुण-तरुणी आतमध्ये लांबवर जातात. आतमध्ये वन्य प्राणी असल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून विशेष खबरदारी घेतल्याचे वन विभाग अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले.