शहरं
Join us  
Trending Stories
1
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
4
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
5
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
6
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
7
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
8
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
9
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
10
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
11
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
13
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
14
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
15
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
16
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
17
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
18
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
19
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
20
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार

कसारा घाटात गॅसटँकर उलटला, चालक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 4:31 AM

उरणहून नाशिक, सिन्नरकडे जाणारा एचपी गॅसचा टँकर सोमवारी सकाळी कसारा घाटात टोपाची बावडीच्या वळणावर उलटला.

कसारा : उरणहून नाशिक, सिन्नरकडे जाणारा एचपी गॅसचा टँकर सोमवारी सकाळी कसारा घाटात टोपाची बावडीच्या वळणावर उलटला. यामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती.कसारा घाट चढत असताना टोपबावडीच्या वळणावर गॅसटँकरला ओव्हरटेक करताना एका कंटेनरने कट मारला. त्यावेळी टँकरचालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि टँकर उलटला. यात चालक जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भोये, पीएसआय डगळे आणि कर्मचारी, घोटी टॅप महामार्ग पोलीस, पिंक इन्फ्रा या महामार्गाच्या ठेकेदार कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काही प्रमाणात गॅसगळती होत असल्याने दक्षता म्हणून कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दुसऱ्या मार्गिकेवरून (नाशिक-मुंबई मार्गिका-नवीन कसारा घाट) वळवण्यात आली. दरम्यान, अपघात झाल्यापासून दोन तासांनी एचपी गॅस बोटलिंग प्लान्टचे प्रोजेक्ट मॅनेजर अखिल पचौरी आणि त्यांचे पथक घटनास्थळी आल्यानंतर काही प्रमाणात गॅसगळती बंद करण्यात आली. मात्र, टँकर पूर्णपणे उलटल्याने गॅसगळती होण्याची भितीहोती.अपघाताची तीव्रता लक्षात घेऊन शहापूरचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी घटनास्थळी भेट देत महसूल कर्मचाऱ्यांना मदतीसाठी तैनात केले. दरम्यान, सुटीचा दिवस असल्याने महामार्गावर गाड्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती, त्यामुळे एकाच मार्गिकेवर दोन्ही लेनच्या गाड्यांमुळे प्रचंड वाहतूककोंडी होती. दरम्यान, टँकर हटविण्यासाठी भिवंडी येथून महाकाय क्रेन मागवण्यात आल्या होत्या.