शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

उसने दिलेले पैसे मागितल्याने गॅस मेकॅनिकची हत्या

By पंकज पाटील | Updated: December 10, 2022 19:30 IST

उसने दिलेले पैसे परत मागितले, म्हणून नातेवाईकांनीच एका गॅस मेकॅनिकची हत्या केल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे.

बदलापूर : उसने दिलेले पैसे परत मागितले, म्हणून नातेवाईकांनीच एका गॅस मेकॅनिकची हत्या केल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करत काही तासातच तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. बदलापूर पश्चिमेच्या वडवली चौकात श्रवणकुमार बिष्णोई आणि प्रकाश बिष्णोई हे दोघे एकाच घरात राहत होते. हे दोघेही एका गॅस एजन्सीत मेकॅनिक म्हणून काम करत होते.

श्रवणकुमार याने प्रकाश याचा सोलापूर येथे राहणारा भाऊ बुधाजी बिष्णोई याला काही उसने पैसे दिले होते. मात्र हे पैसे तो परत करत नसल्याने श्रवणकुमारने बुधाजी याला फोनवरून शिवीगाळ केली होती. याचा राग मनात धरून ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ च्या दरम्यान बुधाजी बिष्णोई याने त्याचा भाऊ प्रकाश आणि साथीदार दिनेश बिष्णोई यांना सोबत घेऊन श्रवणकुमारचं घर गाठले. तिथे त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करत त्याचा गळा दाबून खून केला आणि त्याचा मृतदेह तिथेच टाकून पळून गेले. हे तिघेही पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले.

दुसरीकडे पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी आधी अकस्मात मृत्यूची नोंद केली, मात्र वैद्यकीय अहवालात श्रवणकुमारची हत्या झाल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. यानंतर तांत्रिक तपास करत पोलिसांनी आरोपी बुधाजी बिष्णोई, प्रकाश बिष्णोई आणि दिनेश बिष्णोई यांना काही तासातच बेड्या ठोकल्या. या सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली आहे. 

टॅग्स :thaneठाणे