शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमधील सेंच्युरी रेयॉन कंपनीत गॅस गळती, एकाचा मृत्यू तर अकरा जण गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 07:14 IST

शहरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत गुरुवारी रात्री साडेबारा वाजता गॅस गळती होऊन, एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर अकरा कामगार गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कंपनी परिसरात सतर्कतेचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

उल्हासनगर : शहरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत गुरुवारी रात्री साडेबारा वाजता गॅस गळती होऊन, एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर अकरा कामगार गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कंपनी परिसरात सतर्कतेचा इशारा पोलिसांनी दिला आहे.उल्हासनगर कॅम्प नं-1 शहाड गावठाण परिसरात सेंच्युरी रेयॉन कंपनी आहे. या कंपनीत हजारो कामगार काम करतात. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतील काम ठेकेदाराला दिले होते. ठेकेदाराने खाजगी कामगारांमार्फत काम करणे सुरू केले असता काम लवकर करण्याचा तगादा कंपनी व्यवस्थापनाने ठेकेदाराच्या मागे लावल्याचे समजते. दरम्यान, ठेकेदाराने रात्री सव्वा - साडे बारा वाजता कामाला सुरुवात केली असता कंपनीतील पत्रा तुटून विषारी गॅसची गळती सुरू झाली. त्यावेळी  कंपनीत एकच धावपळ उडाली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने गॅस गळतीवर नियंत्रण मिळविले आहे. मात्र, या गॅस गळतीच्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर अकरा जण गंभीर असून त्यांना कल्याण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.  दरम्यान, सेंच्युरी रेयॉन कंपनीतील गॅस गळतीच्या घटनेमुळे शहाड गावठाण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर