शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

बागेत खेळताना विजेचा धक्का लागून मुलीचा मृत्यू, तर एक चिमुकली जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 20:55 IST

शनिवारी रात्री पडलेल्या पावसामुळे मीरा रोडच्या एका वसाहतीच्या बगीच्यात खेळणाऱ्या चार लहान मुलांना विजेचा धक्का बसल्याची दुर्घटना घडली आहे.

मीरारोड - शनिवारी रात्री पडलेल्या पावसामुळे मीरा रोडच्या एका वसाहतीच्या बगीच्यात खेळणाऱ्या चार लहान मुलांना विजेचा धक्का बसल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये एका 11 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून, एकीला रुग्णालयात दाखल केले आहे. मीरा रोडच्या बेव्हर्ली पार्क भागात सॅण्ड स्टोन नावाचे मोठे गृहसंकुल आहे.323 सदनिका असलेली ही मोठी वसाहत असून, मुलांना खेळण्यासाठी बगीचा आहे. शनिवारी रात्री अचानक आलेल्या पावसाने लोकांची तारांबळ उडाली होती. तर पहिल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी लहान मुलं बगीच्यात खेळत होती. रात्री 8 च्या सुमारास बगीच्याच्या लोखंडी तारेचा स्पर्श झाल्याने चौघा लहान मुलांना विजेचा धक्का लागला. यात श्रुती राम यादव ( 11 ) हिचा विजेचा जबर धक्का लागून मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या श्रद्धा सुरेंद्र कनोजिया ( 12 ) या मुलीला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन मुलांना मात्र किरकोळ दुखापत झाल्यानं ते बालंबाल बचावले.श्रुती ही 5 व्या इयत्तेत शिकत होती. तर श्रद्धा हिला आज घरी आणण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मीरा रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केलाय. पावसामुळे उघड्यावर असलेल्या वीज वाहक तारेचा स्पर्श लोखंडी जाळीला होऊन त्यात विद्युत प्रवाह पसरल्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी व्यक्त केली आहे . रिलायन्स एनर्जीचे अधिका-यांना पाचारण केले होते. त्यांनी देखील पाहणी केली आहे. या प्रकरणी पालकांनी तक्रार दिल्यास गुन्हा दाखल करू, असे ते म्हणाले.या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून, नागरिकांनी आपल्या वसाहती व घर परिसरातील वीजवाहक तारा, विजेचे दिवे व उपकरणे आदींची तपासणी करून घ्यावी. वीज प्रवाह पसरून विजेचा धक्का लागणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन लब्दे यांनी केले.