शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

कल्याण-डोंबिवलीत कचरा, खड्ड्यांची समस्या, नागरिक हैराण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 01:36 IST

Kalyan-Dombivali News : दरवर्षी पडणाऱ्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. सध्या लोकल बंद असल्याने सगळा ताण रस्तेवाहतुकीवर येत आहे. अशातच खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीत भरच पडत आहे.

- मुरलीधर भवार कल्याण : केडीएमसी हद्दीत कचरा, खड्डे या प्रमुख समस्या डोकेदुखी ठरत आहेत. आधारवाडी डम्पिंगच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. हे डम्पिंग बंद करण्यासाठी अन्य घनकचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेनुसार सुरू झालेले नाहीत. तर, काही प्रकल्पांचे काम अद्याप सुरू आहे. दुसरीकडे कंत्राटदार नियमितपणे कचरा उचलत नसल्याने शहरात कचऱ्याचे ढीग साचत आहेत.     दरवर्षी पडणाऱ्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. सध्या लोकल बंद असल्याने सगळा ताण रस्तेवाहतुकीवर येत आहे. अशातच खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीत भरच पडत आहे. दरम्यान, केडीएमसीत २३ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. त्यांच्या जोडीला भाजपही होता. मात्र, आता भाजपने त्यांच्यापासून फारकत घेतल्याने या समस्या सुटल्या नाहीत. मात्र, यासाठी शिवसेनेलाच दोष देण्यात भाजप धन्यता मानत आहे. 

 २७ गावांत ठणठणाटकेडीएमसी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करते. महापालिकेत २७ गावे समाविष्ट करण्यात आली, तेव्हा पाणीपुरवठ्याची स्वतंत्र योजना आखण्यात आली. त्यापैकी १८ गावे महापालिकेतून वगळली असून, उर्वरित नऊ गावे महापालिकेत आहे. मात्र, २७ गावांत पाणीसमस्या आजही कायम आहे.  

 १५ कोटी खर्चूनही खड्डे  कल्याण पश्चिमेतील तीन आणि पूर्वेतील एक अशा चार प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यानंतर कल्याण- डोंबिवलीतील अन्य ४६ रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले. मात्र, डांबरी रस्त्यांवरील खड्डे दरवर्षी बुजविले जातात. रस्तेदुरुस्ती व खड्डे बुजविण्यावर १५ कोटींपेक्षा जास्त खर्च केला जातो. मात्र, दरवर्षी खड्डेपुराण काही संपत नाही.

 कचरा कंत्राटदाराला दंडकेडीएमसीने १० पैकी चार प्रभाग क्षेत्रांत कचरा उचलण्याच्या कामाचे खाजगीकरण केले आहे. मात्र, कंत्राटदाराकडून कचरा उचलण्यात अनियमितता होत आहे. त्याला वर्षाला मनपा १०७ कोटी रुपये मोजते. मात्र, तो कचरा वेळेवर उचलत नाही. तसेच कचऱ्याचे वर्गीकरण करत नाही. अनियमितताप्रकरणी त्याला एक कोटी २७ लाखांचा दंड ठोठावला आहे. 

काेंडीत गुदमरतो जीवकल्याण शहराच्या प्रवेशद्वारांवर पुलांची कामे सुरू आहेत. त्यात दुर्गाडी खाडीपूल, नवीन पत्रीपुलाचा समावेश आहे. त्याचबरोबर डोंबिवलीतील कोपर दिशेकडील आणि ठाकुर्ली पुलाचे कल्याण दिशेला काम सुरू आहे. कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरी व काँक्रिटीकरण सुरू आहे. त्यातच खड्ड्यांमुळे कल्याण आणि डोंबिवलीत वाहतूककोंडी होत असल्यामुळे नागरिक बेजार झाले आहेत.  

ड्रेनेजची कामे सुरूच केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत मनपा हद्दीत दोन टप्प्यांत ड्रेनेजचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील काम ६५ टक्के, तर दुसऱ्या टप्प्यातील काम ५० टक्के झाले आहे. मात्र, काही मलवाहिन्या या प्रकल्पाशी जोडल्या गेल्या नसल्याने प्रकल्प कार्यान्वित झालेले नाहीत. गेल्या वर्षभरापासून त्याच्या चाचण्याच सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.  

कचऱ्याचे प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. डिसेंबरअखेरपर्यंत आधारवाडी डम्पिंग बंद करण्याचे उद्दिष्ट आहे. कचरा उचलण्याचे काम चार प्रभाग क्षेत्रांत कंत्राटदाराला दिले आहे. एका प्रक्रियेतून दुसऱ्या प्रक्रियेत जात असताना काही गोष्टींना विलंब होतो. कचरा वर्गीकरण ही जबाबदारी नागरिकांचीही आहे. त्यांनीही कचरा वर्गीकरणास सहकार्य करावे. राहिला प्रश्न खड्ड्यांचा, केडीएमसीतील महत्त्वाचे रस्ते हे काँक्रिटचे करण्यात आले आहेत. डांबरी रस्ते हे अतिवृष्टीमुळे दरवर्षी खराब होतात. त्यावर खड्डे पडतात. पावसात खड्डे बुजविण्यास विलंब झाला आहे. सध्या खड्डे बुजवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. कल्याण- शीळ रस्त्याचे सहापदरीकरण सुरू आहे. प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे स्वत: जातीने लक्ष ठेवून आहेत.- विनीता राणे, महापौर, कल्याण-डोंबिवली

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली