शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

ऐन सणासुदीत शहरात कचराकोंडी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:23 IST

तीन महिने वेतन थकले : कंत्राटी कामगारांचे आजपासून ठिय्या आंदोलन

कल्याण : केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनाचा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला असताना दुसरीकडे वेतनाच्या मागणीसाठी बुधवारपासून त्यांनी कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत वेतन मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने घेतला आहे. त्यामुळे ऐन सणात शहरात कचराकोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस’ने १२० घंटागाडीचालक व २८० सफाई कामगार, असे ४०० कामगार केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागास पुरविले आहेत. परंतु, तीन महिन्यांपासून त्यांना वेतन मिळालेले नाही. त्यातच कंत्राटदार व पालिका यांच्यात झालेल्या करारानुसार वेतन दिले जात नसल्याने युनियनने महात्मा फुले चौक पोलिसात कंत्राटदार व पालिकेचे अधिकारी यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे.

मात्र, महापालिकेकडूनच बिल न मिळाल्याने तीन महिने वेतन देता आलेले नाही, असे कंत्राट कंपनीचे संचालक श्रीरंग लांडे यांचे म्हणणे आहे. तर, वेतन न मिळाल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्याचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी सांगितले.

दरम्यान, तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कंत्राटी कामगारांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. बुधवारपासून काम बंद करीत ठिय्या मांडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. एकही कचºयाची गाडी बाहेर पडणार नाही, असा पवित्रा घेतल्याने युनियन आणि कंत्राटदार कंपनीच्या वादात शहरात कचºयाचे ढीग जागोजागी दिसण्याची शक्यता आहे....तरच कचरा गाड्या बाहेर पडतीलकामगारांना तीन महिने वेतन मिळालेले नाही. सणासुदीत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. वेतन मिळाल्यावरच कचरागाड्या बाहेर पडतील, अन्यथा आंदोलन सुरूच राहील. वेतन थकल्याबाबत प्रशासनाला माहिती आहे. मग आंदोलनाबाबत कशाला माहिती द्यायची, त्यांनी कामगारांची मानसिकता समजून घेणे आवश्यक आहे, असे मत युनियनचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर यांनी व्यक्त केले.प्रशासन अनभिज्ञकेडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर म्हणाले, की त्यांना या आंदोलनाबाबत कोणतीही माहिती नाही. युनियनने असे कोणतेही निवेदन प्रशासनाला दिलेले नाही. वेतनासंदर्भात कंत्राटदाराशी बोलणी सुरू आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण