शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

खिल्ली उडवल्याने ठेकेदाराच्या कार्यालयात टाकला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 12:19 AM

पठाण यांची कृती : ...तर अधिकाऱ्यांच्या दालनात फेकणार कचरा

ठळक मुद्देमुंब्रा येथे अभिषेक कन्स्ट्रक्शन आणि अमृत एंटरप्रायझेस या दोन कंपन्यांना कचरा उचलण्याचा ठेका देण्यात आलेला आहे. मात्र, या कंपन्यांचे कर्मचारी स्वत:च्या सोयीनुसार कचरा उचलतात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कचरा उचलण्यास नकार देऊन नागरिकांची खिल्ली उडवल्याने संतापलेल्या विरोधी पक्षनेते अश्रफ (शानू) पठाण यांनी कचराकुंडीत जमा झालेला कचरा दुचाकीवरून नेऊन सोमवारी ठेकेदाराच्या कार्यालयात टाकला. दरम्यान, ठाणे महापालिकेमध्ये कचऱ्यात मोठ्या  प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. हा भ्रष्टाचार उघडकीस आणणार असून ही समस्या निकाली न लावल्यास अधिकाऱ्यांच्या दालनात कचरा टाकू, असा इशारा पठाण यांनी दिला. 

मुंब्रा येथे अभिषेक कन्स्ट्रक्शन आणि अमृत एंटरप्रायझेस या दोन कंपन्यांना कचरा उचलण्याचा ठेका देण्यात आलेला आहे. मात्र, या कंपन्यांचे कर्मचारी स्वत:च्या सोयीनुसार कचरा उचलतात. किस्मत कॉलनी आणि दारुल फलाड परिसरात कचऱ्यातील लाकूड आणि गाद्या  आदी न उचलता ते कचराकुंडीत किंवा आजूबाजूला फेकून देतात. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही कचरा उचलण्यात येत नव्हता. त्यामुळे नागरिकांनी पठाण यांच्याकडे तक्रार केली होती.  यासंदर्भात पठाण यांच्यासमोरच दूरध्वनीवरून अमृत एंटरप्रायजेस कार्यालयात संपर्क साधण्यात आला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्यांनी कचरा उचलण्यास तर नकार दिलाच; शिवाय, तक्रार करणाऱ्यांची खिल्ली उडविली. त्यामुळे संतापलेल्या पठाण यांनी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास थेट किस्मत कॉलनी परिसर गाठला. त्या ठिकाणी अमृत एंटरप्रायझेस या कंपनीच्या मालकीची कचऱ्याची गाडी उभी होती. 

या गाडीतील कर्मचारी कचरा उचलत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर पठाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हाच कचरा गोणींमध्ये भरून दुचाकीवरून रेतीबंदर येथील अमृत एंटरप्रायझेस आणि अभिषेक कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात नेऊन ओतला. कचऱ्याबाबतीत ठाणे महापालिकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. ठाणे पालिकेतील अधिकाऱ्यांना मलिदा मिळत असल्याने ते अशा ठेकेदारांवर कारवाई करीत नाहीत. आता आपण या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार असून कचरा उचलण्याची ही चुकीची पद्धत संपुष्टात न आल्यास घनकचरा व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांच्या दालनात नेऊन आपण कचरा फेकणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका