शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

दळखणमध्ये इ-रिक्षाद्वारे गोळा होणार कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:45 IST

ग्रामपंचायतीचा उपक्रम : पर्यावरणाला दिले महत्त्व, चार तास चार्ज केल्यावर १०० किलोमीटर धावणार

आसनगाव : शहापूर तालुक्यातील दळखण ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच भगवान मोकाशी यांनी लोकप्रतिनिधीची इच्छाशक्ती असल्यास गावाचा कायापालट कसा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आहे. सोमवारी गावात इ-रिक्षाद्वारे कचरा गोळा करणाऱ्या सुविधेचे उद्घाटन करून दळखण ग्रामपंचायत ठाणे जिल्ह्यात पहिली ठरली आहे. या अनोख्या उपक्र माबद्दल मोकाशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.

ठाणे जिल्ह्यात पहिली इ-रिक्षा म्हणजेच इंधन विरहीत इलेक्ट्रिकवर चालणारी व पर्यावरणमुक्त अशा इ-रिक्षाद्वारे कचरा गोळा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ४ तास चार्ज केल्यावर १०० किलोमीटर चालते. ओला व सुका कचरा गोळा करणारी ही इ-रिक्षा वापरणारी दळखण ग्रामपंचायत जिल्ह्यात पहिली ठरली आहे.

ग्रूप ग्रामपंचायत दळखणतर्फे इ-रिक्षाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रभारी सरपंच मोकाशी, मंगला डोके, माजी उपसरपंच दिगंबर म्हसकर, भाई देहेरकर, विनायक आपटे, रफिक सय्यद, तुकाराम सरखोत, मधुकर मोकाशी, तुकाराम सरखोत, शरद सरखोत, चंद्रकांत म्हसकर, भाऊसाहेब भेरे, पांडुरंग मोकाशी, प्रवीण सरखोत, मारु ती मोकाशी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

या आहेत अन्य सुविधादळखण गावामध्ये करण्यात आलेल्या सोयीसुविधा व विकासकामामध्ये विविध योजनेअंतर्गत गरीब व गरजूंना त्यांचे हक्काचे घरे, स्वच्छतागृह, रस्त्यांची कामे, पेव्हर ब्लॉक बसवणे, तरूणांना खेळाचे साहित्य देणे, आरोग्य शिबिर, व्यायामशाळा, प्रत्येक कुटुंबास कचºयाचे डबे देणे, वृक्षारोपण करणे आदी उपक्रम राबवले आहेत. ग्रामपंचायत तसेच कोणत्याही सुविधेबाबत तक्र ार असेल तर हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण गावात सीसीटीव्ही लावले असून प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे ८ हायमास्ट बसवण्यात आले आहेत.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा