शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पहाटेच्या वेळी रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 21:04 IST

कामानिमित्त पहाटेच्या वेळी रिक्षाने प्रवास करणाºया प्रवाशांना लुटणा-या मोहम्मद हयात सय्यद (३०, रा. मुंब्रा), मुस्तफा पावसकर (३७, रा. श्रीलंका, मुंब्रा) आणि मुज्जमील उर्फ गुड्डू उर्फ हॉरर शेख (२४, रा. मुंब्रा) या तिघा जणांच्या टोळीला डायघर पोलिसांनी अटक केली. हे तिघेही चोरी आणि जबरी टोळीतील सराईत गुन्हेगार असून यातील मोहम्मद सय्यद याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात पाच तर नांदेड येथील लकडगंज पोलीस ठाण्यात दरोडयाचा एक असे सहा गुन्हे नोंद आहेत.

ठळक मुद्दे डायघर पोलिसांची कारवाईलॅपटॉपसह ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कामानिमित्त पहाटेच्या वेळी रिक्षाने प्रवास करणाºया प्रवाशांना लुटणाºया मोहम्मद हयात सय्यद (३०, रा. मुंब्रा), मुस्तफा पावसकर (३७, रा. श्रीलंका, मुंब्रा) आणि मुज्जमील उर्फ गुड्डू उर्फ हॉरर शेख (२४, रा. मुंब्रा) या तिघा जणांच्या टोळीला डायघर पोलिसांनी अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी सोमवारी दिली. त्यांच्याकडून जबरी चोरीतील लॅपटॉपसह ६५ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.डायघर गावातील रहिवाशी योगेश लोहार हे २२ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कल्याणफाटा येथून कळंबोली बस थांबा येथे जात होते. ते दहिसर मोरी येथे आल्यावर रिक्षात बसलेल्या अन्य दोन प्रवाशांनी रिक्षा चालकाशी संगनमताने योगेश यांना हाताने मारहाण केली. नंतर त्यांच्याकडील लॅपटॉप, मोबाईल पॉवर बँक आणि रोकड असा २८ हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरुन रिक्षातून उतरुन पसार झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे आणि भूषण कापडणीस यांच्या पथकाने सापळा लावून मोहम्मद सय्यद याच्यासह तिघांना ४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अटक केली. सखोल चौकशीमध्ये त्यांनी या जबरी चोरीची कबूली दिली. त्यानंतर त्यांच्याकडून लॅपटॉप, पॉवर बँक, आधारकार्ड आणि जबरी चोरीसाठी वापरलेली रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिघांनाही ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.* हे तिघेही चोरी आणि जबरी टोळीतील सराईत गुन्हेगार असून यातील मोहम्मद सय्यद याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात पाच तर नांदेड येथील लकडगंज पोलीस ठाण्यात दरोडयाचा एक असे सहा गुन्हे नोंद आहेत. पावसकर याच्याविरुद्ध मुंबई ठाण्यात चोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून अन्यही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक