शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दरोडा टाकणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 05:25 IST

नाशिक महामार्गावर दरोडा टाकून वाहनचालकास लुटणाºया आठ जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ ने कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली. तसेच ही टोळी जनावरे चोरी करून त्यांची विक्री करत असल्याचेही उघडकीस आले आहे.

ठाणे  - नाशिक महामार्गावर दरोडा टाकून वाहनचालकास लुटणाºया आठ जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ ने कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली. तसेच ही टोळी जनावरे चोरी करून त्यांची विक्री करत असल्याचेही उघडकीस आले आहे.त्यांच्याकडून एक कार, रोख रक्कम, पाच मोबाइल आणि जनावरांना गुंगी देणाºया औषधांच्या तीन बाटल्या, इंजेक्शन असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या टोळीचा फरार म्होरक्या अकबर शौकत शेखचा शोध सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.कळवा पोलीस ठाण्यात १६ सप्टेंबर रोजी फिर्यादी सोहेल शेखच्या तक्रारीनुसार, दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. सोहेल आणि त्याचे मालक नौशाद अहमद शेख हे ११ सप्टेंबर रोजी डोंगरी येथून मालाचे पैसे घेऊन संगमनेरकडे जात होते. खारेगाव टोलनाक्यावर त्यांच्या गाडीसमोर एक कार आडवी लावून सात ते आठ जणांनी जबरदस्तीने गाडीचा ताबा घेऊन मुंब्रा बायपास रोडवर मारहाण केली. त्यांच्याकडून रोकड आणि मोबाइल व कार असा चार लाख ४२ हजारांचा ऐवज घेऊन ते पळून गेले. या प्रकरणी कळवा पोलीस आणि ठाणे गुन्हे शाखा समांतर तपास करत असताना यातील आरोपी चोरलेल्या मुद्देमालासह कर्नाटक येथील गुलबर्गा येथे पळून गेल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ या पथकाला मिळाली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने १५० लॉजच्या केलेल्या तपासणीत एका लॉजमध्ये काही जण मुंबईतील असल्याचे कळले. त्यांच्यावर नऊ तास पाळत ठेवून भिवंडीतील मोजम शब्बीर शेख (२४), अबू फैसल अब्दुल रशीद अन्सारी (२२), सय्यद वाजीद सय्यद मुसा (३०), फिरोज अकबर सय्यद (२४) या चौकडीला अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून तेथील गेसुधाराज लॉज येथून मोहम्मद हुसैन अब्दुल रहिमान शेख (३३), मोहम्मद शाकीर मोहम्मद कासीम शेख (४०) आणि वाहिद शौकत शेख (२२) या तिघांना अटक केली. त्यांनी गुन्ंह्याची क बुली दिली असून त्यांना फि र्यादी सोहेल याचा मित्र आवेज ऊर्फ चिन्या याने वेळोवेळीच्या ठावठिकाणांबाबत माहिती दिल्याचे सांगितल्यावर त्यालाही अटक केली. त्यांना २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे