शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बलात्काराचा ‘तो’ बनावच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 23:35 IST

पतीला बलात्कार आणि अ‍ॅसिड हल्ल्याच्या प्रकरणात गोवणाºयांवर तसाच आरोप करून सामूहिक बलात्काराचा ‘तो’ बनाव केल्याची कबुलीच कळव्याच्या घोलाईनगर येथील महिलेने ठाणे न्यायालयात दिली आहे

जितेंद्र कालेकरठाणे : पतीला बलात्कार आणि अ‍ॅसिड हल्ल्याच्या प्रकरणात गोवणाºयांवर तसाच आरोप करून सामूहिक बलात्काराचा ‘तो’ बनाव केल्याची कबुलीच कळव्याच्या घोलाईनगर येथील महिलेने ठाणे न्यायालयात दिली आहे. खोटी फिर्याद देऊन पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून न्यायालयाची दिशाभूल करणाºया या महिलेवरही आता कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.आपल्यावर सहा जणांनी सामूहिक अत्याचार करून अ‍ॅसिडहल्ला केल्याचा बनाव या महिलेने २३ जुलै २०१७ रोजी केला होता. तशी तिने कळवा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. याप्रकरणी सहापैकी गोपाल कल्लीम, रंगाप्पा आणि शेखर शंके या तिघांना कळवा पोलिसांनी अटक केली होती. त्यांना ८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी, कळवा विभागाचे सहायक आयुक्त रमेश धुमाळ, कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. बागवान आदींच्या मार्गदर्शनाखाली कळवा पोलिसांनी केलेल्या चौकशीत सहापैकी उर्वरित तिघे हे कर्नाटक आणि तेलंगणात असल्याचे उघड झाले. हा सर्वच प्रकार बनावट असल्याचे अनेक सबळ पुरावेच पोलिसांनी दिल्यानंतर तिच्या मुलीने आणि नंतर तिनेही ते मान्य केले. परंतु, न्यायालयातही तिने तोच जबाब देणे गरजेचे होते. ठाणे न्यायालयात याबाबत सुनावणी झाली, त्या वेळी तिने मुलीच्या सल्ल्यानुसार या बनावाची कबुली दिली.आरोपींपैकी शिरसप्पाच्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकल्याचा तिचा पती व्यंकटेश यांच्यावर आरोप झाला होता. त्यामुळे विनयभंग आणि अ‍ॅसिडहल्ल्यात त्याला कर्नाटक पोलिसांनी अटक केली. या संपूर्ण प्रकरणात आपल्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पुन्हा ते त्याला ३ आॅगस्ट रोजी आणखी एखाद्या प्रकरणात गोवण्याच्या तयारीत होते. हे कळाल्यामुळेच त्याने आपल्या मुलीची काळजी घे, असा फोन पत्नीला केला. हे संभाषण मुलीनेही ऐकल्यामुळेच तिनेच वरील सहा जणांना या बलात्कार नाट्यात अडकवून अद्दल घडवण्याची शक्कल आईला सुचवली. त्यामुळेच त्यांच्यावर हा आरोप केल्याचे अखेर या महिलेने न्यायालयासमोर सांगितले. आरोपच खोटा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कलीमसह तिघांची पोलीस कोठडीही न्यायालयाने रद्द करून त्यांची सुटका केली आहे.वैयक्तिक सूडभावनेतून सहा जणांना नाहक गोवणाºया महिलेवरही कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दिली. यासंदर्भात न्यायालयात ब पत्राचा अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे. या अहवालानंतर न्यायालयाने निर्देश दिल्यानंतरच या महिलेवरही कारवाई होण्याची शक्यता पोलीस निरीक्षक बागवान यांनी वर्तवली आहे.