शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन चोरांची टोळी जेरबंद, टोळीचा म्होरक्या अवघा १९ वर्षांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 03:06 IST

उल्हासनगर शहर गुन्हे अन्वेषण विभागाने मोटारसायकल चोरीप्रकरणी अल्पवयीन आरोपींची टोळी जेरबंद केली आहे. या टोळीतील पाचपैकी चार आरोपी अल्पवयीन असून त्यांच्याकडून चोरीच्या २५ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

उल्हासनगर : शहर गुन्हे अन्वेषण विभागाने मोटारसायकल चोरीप्रकरणी अल्पवयीन आरोपींची टोळी जेरबंद केली आहे. या टोळीतील पाचपैकी चार आरोपी अल्पवयीन असून त्यांच्याकडून चोरीच्या २५ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.उल्हासनगर पोलीस परिमंडळांतर्गत मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात वाढ झाली होती. दुचाकीचोरीच्या दररोज दोन ते तीन गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यांमध्ये होत आहे. वाढत्या गुन्ह्यांनी वाहनधारकांसोबतच पोलीसही हैराण झाले आहेत. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, सखोल तपास करण्याचे आदेश शहर गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. त्याअनुषंगाने गुन्हे अन्वेषण विभागाने गोपनीय माहितीच्या आधारे पाच जणांच्या टोळीला सापळा रचून ताब्यात घेतले. या टोळीचा म्होरक्या धनंजय कुमावत हा १९ वर्षांचा असून त्याचे चार साथीदार अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडून १५ स्कूटर आणि १० मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या.धनंजय कुमावत याच्यावर घरफोडीसह अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख महेश तरडे यांनी दिली. धनंजय कुमावत याला न्यायालयाने २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली असून चार अल्पवयीन साथीदारांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. आरोपीच्या चौकशीतून चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येतील, असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी व्यक्त केला. उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मोटारसायकलचोरांच्या आणखी काही टोळ्या शहरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या टोळ्यांवर गुन्हे अन्वेषण विभाग लक्ष ठेवून असल्याचे पोलिसांनी सांगितले.मौजमजेसाठी चोरीआरोपींनी सुरुवातीला मौजमजेसाठी मोटारसायकली चोरण्याचा उद्योग सुरू केला. चोरीच्या गाड्यांची ते विक्री करत होते. त्यातून मिळालेल्या पैशांतून मौजमजा करायचे. गुन्हे अन्वेषण विभागाने मोटारसायकलचोरीच्या दुसऱ्या टोळीला यापूर्वीही गजाआड केले होते. गेल्या आठवड्यातही विठ्ठलवाडी पोलिसांनी गाड्या चोरणाºया एका टोळीला अटक करून त्यांच्याकडून ११ मोटारसायकली जप्त केल्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी