शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत माथाडीच्या ठेक्यावरुन गणेश कोकाटेची गोळी झाडून हत्या; कशेळी टोल नाक्याजवळील घटना

By जितेंद्र कालेकर | Updated: December 7, 2022 22:06 IST

नारपोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा

जितेंद्र कालेकर/नितिन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे/भिवंडी: माथाडीच्या कामांचा ठेका मिळविण्याच्या स्पर्धेतून भिवंडीतील कशेळी टोल नाक्याजवळ गणेश दुर्योधन कोकाटे (३३) या गुंडाची अज्ञात मारेकऱ्यांनी गोळी झाडून हत्या केल्याची घटना बुधवारी  रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

गणेश पूर्वी हा ठाण्यातील लोकमान्यनगर भागात वास्तव्याला होता. तो अलिकडेच भिवंडीतील कशेळी भागातील पवनपुत्र सोसायटीमध्ये वास्तव्याला गेला होता. त्याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यासह वेगवेगळया पोलीस ठाण्यांमध्ये हाणामारीचे १३ ते १४ गुन्हे दाखल आहेत. बुधवारी तो त्याच्या मोटारकारमधून ठाण्यातून कशेळीकडे आपल्या घराकडे जात असतांना कशेळी टोल नाक्याजवळ आधीच दबा धरुन बसलेल्या काही गुंडांनी त्याच्या मोटारीच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. 

यात भिवंडीतील कशेळी ग्रामपंचायत स्वागत कमानीजवळील मोटारीत असलेल्या गणेशच्या  मानेवर एक गोळी लागली. तो रक्ताच्या थारोळयात मोटारीतच निपचित पडला. त्यावेळी तिथे जमा झालेल्या काही लोकांनी त्याला ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा रात्री ९.३० वाजण्याच्या दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळी भिवंडीचे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे, नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी भेट देऊन पाहणी केली. आरापीच्या शोधासाठी दोन पथकांची निर्मिती केली असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे उपायुक्त ढवळे यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेBhiwandiभिवंडी