शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गणरायाच्या दागिन्यांना चढला शाही साज, गौरीसाठी मात्र पारंपरिक दागिन्यांचीच चलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 03:29 IST

गणरायाच्या दागिन्यांमध्ये यंदा शाही साज पहायाला मिळत आहे. सोंडपट्टीमध्ये डायमंड, क्लिप, कंठीमध्ये श्रीमंतहार, तर मुकुटामध्ये बालाजी, शाही फेटा असे नवीन प्रकारांचे दागिने यंदा आले आहेत. दुसरीकडे गौरीसाठी मात्र पारंपरिक दागिन्यांचीच चलती आहे.

ठाणे : गणरायाच्या दागिन्यांमध्ये यंदा शाही साज पहायाला मिळत आहे. सोंडपट्टीमध्ये डायमंड, क्लिप, कंठीमध्ये श्रीमंतहार, तर मुकुटामध्ये बालाजी, शाही फेटा असे नवीन प्रकारांचे दागिने यंदा आले आहेत. दुसरीकडे गौरीसाठी मात्र पारंपरिक दागिन्यांचीच चलती आहे.गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस बाकी असताना खरेदीसाठी ठाणेकरांनी वीकेण्डचा मुहूर्त साधला आहे. अ‍ॅडजस्टेबल असलेली क्लिप सोंडपट्टी यंदा फॉर्मात आहे. सोंडेच्या आकाराप्रमाणे ती अ‍ॅडजस्ट करता येते. ती क्लिप सोंडपट्टी, कडा आणि बाजूबंद म्हणूनही वापरता येते. नेहमी सोनेरी रंगामध्ये दिसणारे उपरणे हे यंदा डायमंड आणि मोत्यांमध्येही पाहायला मिळत आहे. कंठीमध्ये विविध प्रकार पाहायला मिळत आहे. यात मोदक कंठी, जास्वंदी कंठी, त्याबरोबर श्रीमंतहारसारखी असलेली कंठी, पट्टी डायमंड कंठी नव्याने आली आहे. दूर्वाची कंठीदेखील आहे. ती यंदा १५१ रुपयांपासून उपलब्ध आहे. यात वेणी फेटा, पगडी फेटा, डायमंड फेटा मुकुटांमध्ये उपलब्ध आहे. छत्रीमध्येही विविध प्रकार असून ती चार पासून १८ इंचांपर्यंत उपलब्ध आहे. डायमंडची छत्री नव्याने पाहायला मिळत आहे. नियमित मिळणाºया कलशांमध्ये डायमंडचे कलशदेखील आहे, तर एकपासून २१ मोदकांचा संचही उपलब्ध आहे. गणरायाच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी प्रकार पाहायला मिळत आहेत. तर, दुसरीकडे गौरीसाठी पारंपरिक तनमणी, ठुशी, कोल्हापुरी साज, मोहनमाळ, बोरमाळ, शाही हार, श्रीमंत हार, राणी हार, पुतळी हार, लक्ष्मी हार, मेखला, कमरपट्टा, बाजूबंद यासारखे दागिने, तर फॅन्सी प्रकारात डायमंडचे दागिने आहेत. सोन्याच्या दागिन्यांपेक्षा फॉर्मिंग दागिनेच घेणे भक्त पसंत करतात.गणरायासाठी दागिने अनेकांनी घेतलेले असतात. त्यामुळे दागिन्यांपेक्षा गणपतीसमोर सजवण्याच्या वस्तू जास्त खरेदी केल्या जात आहेत. त्यात मोदक, केळी, कुंकाचा करंडा, पाच फळे, पूजेचे ताट, केळीचे पान, पानसुपारी यासारख्या साहित्यांची खरेदी होत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.बाहेरगावी जाणारे भक्त हे आधीच खरेदी करत असल्याने दीड महिन्यापासून दागिने विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. स्थानिक भक्तांची मात्र शेवटच्या दिवसापर्यंत खरेदी सुरू असल्याचे सतीश गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव