शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील गडकरी रंगायतनची पुन्हा वाजली तिसरी घंटा, आवाज मात्र ७० डेसीबलच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 15:00 IST

मागील १५ दिवस दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेले गडकरी रंगायतन अखेर २५ डिसेंबर पासून पुन्हा एकदा नाट्यरसिकांच्या सेवेसाठी खुले झाले आहे.

ठळक मुद्देआवाजावर सल्लागारांनी घातले निर्बंधनियमीत तपासणी करण्याच्या सुचना

ठाणे - ठाण्यातील महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या प्रेक्षागॅलरीच्या छताचा भाग कोसळल्याची घटना ६ डिसेंबर रोजी घडली होती. त्यानंतर दुरुस्तीचे काम केल्यानंतर आता सोमवार पासून पुन्हा या नाट्यगृहाची तिसरी घंटा वाजण्यास सुरवात झाली आहे. परंतु या थिएटरचा आवाज ७० डेसीबल पेक्षा जास्त ठेवू नये आणि नियमीत तपासणी करण्याच्या सुचना सल्लागारांनी दिल्या आहेत.                 ठाण्यातील गडकरी रंयागतनचे १९७५ भुमीपुजन करण्यात येऊन तर १५ डिसेंबर १९७८ साली हे नाट्यगृह तमान ठाणेकरांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर पुन्हा १४ मार्च १९९९ साली या नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या नाट्यगृहाची क्षमता ९६२ एवढी आहे. दरम्यान ६ डिसेंबर रोजी गडकरी रंगायतनमधीलच खालील बाजूला असलेल्या प्रेक्षागॅलरीच्या छताचा काही भाग पडल्याची घटना घडली होती. परंतु या घटनेनंतर गडकरी रंगायतनच्या बाबतीत मागविण्यात आलेल्या तांत्रिक अहवालानुसार २५ डिसेंबर ते दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार होते. त्यानुसार आतील छताच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येऊन ते काम १९ डिसेंबर रोजीच पूर्ण झाले. त्यानंतर साफसफाई झाल्यानंतर सल्लागाराकरवी पालिकेने रंगायतनचा पुन्हा अहवाल मागिवला होता. त्यानुसार अहवाल प्राप्त झाल्यानंतर २५ डिसेंबर अर्थात ख्रिसमसच्या दिवशी गडकरी रंगायतनची तिसरी घंटा वाजली.दरम्यान दुरुस्तीचे काम झाले असले तरी देखील हे नाट्यगृह सुमारे ३९ वर्षे जुने असल्याने या नाट्यगृहाची काळजी घेण्याच्या सुचना सल्लागारांनी आपल्या अहवालात दिल्या आहेत. तसेच, एखादा प्रयोग सुरु असतांना आवाजाची पातळी ७० डिसेबलच्या वर जाणार नाही, याची काळजी घेण्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच वेळोवेळी संपूर्ण गडकरी रंगायतनाची तपासणी करण्याचेही सांगण्यात आले आहे. त्यानुसार गडकरी रंगायतन व्यवस्थापनामार्फत देखील या सुचनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त