शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील नक्षलवाद समूळ नष्ट करणार -शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 01:11 IST

गडचिरोली भागातील नक्षलवादाचा समूळ नायनाट करण्यासाठीही प्रयत्न करण्याची ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात गुरुवारी दिली.

ठाणे : ठाणेकरांच्या आशीर्वादामुळेच नगरविकासमंत्री बनल्याने ठाण्याचा विकास तर साध्य करूच, शिवाय गडचिरोली भागातील नक्षलवादाचा समूळ नायनाट करण्यासाठीही प्रयत्न करण्याची ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात गुरुवारी दिली. ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ते बोलत होते.ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटी, ठाणे संचालित ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन तसेच पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्र माला शिंदे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शैक्षणिक वर्षात शिक्षण, क्र ीडा व इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना ठाणे उपजिल्हाप्रमुख व माण तालुका संपर्कप्रमुख शंकर वीरकर, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, नगरसेवक भूषण भोईर, रोटरी क्लब आॅफ ठाणे अच्युत दामले, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब दगडे, मुख्याध्यापक प्रभाकर पाटील, मुख्याध्यापिका माधुरी ढवळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. ठाणेकर जनता व पक्षश्रेष्ठी यांच्या आशीर्वादामुळे शिवसेनेचा सर्वसामान्य कार्यकर्ता, शाखाप्रमुख ते राज्याचा कॅबिनेट मंत्री झाल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. तसेच, ठाणेकरांच्याच आशीर्वादामुळे ७० टक्के नागरिकांशी निगडित असलेल्या आणि आधी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकाससारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली. ठाणे जिल्ह्याबरोबर नक्षलवादी क्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणूनदेखील जबाबदारी मिळाली आहे.जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठीच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले आहे. या सरकारमध्ये मिळालेल्या जबाबदाºया निष्ठेने पार पाडत ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्राचा विकास करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला. दरम्यान, गोरगरीब मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्ञानपीठसारखी संस्था काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे