शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे आयुक्तालयांत निनावी फोन करणाऱ्यास भिवंडीत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 18:34 IST

भिवंडी : शहरात गणेशोत्सावाची धामधुम सुरू असताना ‘ भिवंडीत बॉम्बस्फोट होणार आहे’,असा मोबाईलवरून निनावी फोन करून पोलीसांची धावपळ उडविणा-या एका इसमाला शहर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी चार तासांत गजाआड करण्यात यश मिळविले आहे. या घटनेनंतर ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून शहरात अधिक प्रमाणांत पोलीस बंदोवस्त वाढविण्यात आला आला आहे. बासुदेव गौतम राय(४०) ...

ठळक मुद्देभिवंडीत बॉम्बस्फोट होणार आहे असा मोबाईलवरून निनावी फोनठाणे आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात निनावी फोनचार तासांत पोलीसांनी केले आरोपीस अटक

भिवंडी: शहरात गणेशोत्सावाची धामधुम सुरू असताना ‘भिवंडीत बॉम्बस्फोट होणार आहे’,असा मोबाईलवरून निनावी फोन करून पोलीसांची धावपळ उडविणा-या एका इसमाला शहर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी चार तासांत गजाआड करण्यात यश मिळविले आहे. या घटनेनंतर ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून शहरात अधिक प्रमाणांत पोलीस बंदोवस्त वाढविण्यात आला आला आहे. बासुदेव गौतम राय(४०) असे निनावी फोन करणा-याचे नांव असुन तो मुळ कलकत्ता येथील रहाणारा आहे. पद्मानगर येथील गायत्रीनगरमध्ये सध्या त्याचे वास्तव्य असुन तो यंत्रमाग कामगार आहे. काल गुरूवारी दुपारी शहरातील सर्व पोलीस गणेशोत्सावाच्या बंदोवस्तात असताना त्याने दारूच्या नशेत ठाणे आयुक्तालयातील पोलीस नियंत्रण कक्षात निनावी फोन करून पोलीसांची झोप उडवून टाकली. ठाणे गुन्हे शाखा पोलीसांनी आपल्या तपास यंत्रणेव्दारे सदर मोबाईलच्या घटनास्थळाचा शोध घेतला असता तो भिवंडीत असल्याचे आढळून आले. त्यानुसार भिवंडीतील शहर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविल्याने तो मोबाईल धारक शहरातील पद्मानगर येथील गायत्रीनगर येथील असल्याचे आढळून आले. त्याचा शोध घेत पोलीसांनी चार तासांत आरोपी बासुदेव राय यास दारूच्या नशेत अटक केली. मात्र सणांचे दिवस असल्याने या बाबत पोलीसांनी अत्यंत गुप्तता पाळली. शहर पोलीस ठाण्यात बासुदेव राय याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन त्यास पोलीसांनी जेल मध्ये ठेवले आहे.निनावी फोन करणा-या व्यक्तीस पोलीसांनी अटक केली तरी ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून शहरात गणेशोत्सावाच्या निमीत्ताने शहरात सुरक्षीततेच्या उपाय योजना राबविण्यास काल गुरूवार पासुन सुरू केल्या आहेत. आज शुक्रवारी रोजी दंगा नियंत्रण पथकाच्या दोन कंपन्या तसेच राज्य सुरक्षा बलच्या चार कंपन्या शहरात तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांना अफवावर विश्वास न ठेवता पोलीसांशी संपर्क ठेवावा.तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांना सहकार्य करावे,असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी