शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

रोजगार हमीच्या योजनेला मिळाला निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 03:21 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत दोन वर्षांपासून केलेल्या कामाचे दाम मिळत नाही. नवीन कामावर मजूर मिळत नाहीत. शासन दररोज नवनवीन घोषणा करते, मात्र केलेल्या कामांचा निधी मिळाला नसल्याने अनेक कामे अर्धवट रखडलेली आहेत.

मुरबाड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत दोन वर्षांपासून केलेल्या कामाचे दाम मिळत नाही. नवीन कामावर मजूर मिळत नाहीत. शासन दररोज नवनवीन घोषणा करते, मात्र केलेल्या कामांचा निधी मिळाला नसल्याने अनेक कामे अर्धवट रखडलेली आहेत. रोजगार हमी योजनेत केलेल्या कामांचा निधी मिळावा, अशी मागणी सरळगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नेताजी घुडे यांनी शासनाकडे केली. यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने ७ मार्च रोजी प्रसिद्ध केले होते. या बातमीची दखल घेत शासनाने मुरबाड तालुक्यासाठी निधी दिला आहे.मागेल त्याला काम देण्यासाठी शासनाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली. पूर्वीच्या सर्व योजना बंद करून एका नावाखाली सर्व कामे आणली. परंतु, या योजनेत निधी उपलब्ध होत नसल्याने या योजनेखाली सुरू असलेली असंख्य कामे मुरबाड तालुक्यात अर्धवट स्थितीत आहेत. तालुक्यात २८ हजार मजूर कुटुंबे आहेत आणि ८१ हजार मजुरांची नोंदणी झालेली आहे. या योजनेंतर्गत कोट्यवधी रु पयांची कामे मुरबाड तालुक्यात सुरू आहेत. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मुरबाड पंचायत समितीकडे अपुरे मनुष्यबळ, योग्य तांत्रिक अधिकारी किंवा असलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन न मिळणे, यामुळे संपूर्ण तालुक्यात योजनेचा बोजवारा उडाला आहे. या योजनेमार्फत झालेल्या कुशल सदरातील ७७१ बिलांपोटी मुरबाड तालुक्यात ७५ लाख इतकी बिले निधीअभावी प्रलंबितहोती.यामध्ये वैयक्तिक लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने लाभार्थ्यांमध्ये असंतोष आहे. याचा सामना स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामसेवक यांना सहन करावा लागत आहे. अनेक नवनवीन कामांची कुशलची देयके पंचायत समितीकडे सादर होत आहेत. परंतु, निधीची तरतूद होत नसल्याने सर्वच कामे अर्धवट लटकली आहेत. यात वैयक्तिक शौचालय, सिंचन विहीर, फळबाग लागवड, शोषखड्डे, रोपवाटिका, गाव-शिवार रस्ते, मजगीची कामे यावर विपरित परिणाम झाला आहे. प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी घेऊन सुरू केलेल्या कामावर शासन निधी उपलब्ध करून देत नसेल, तर हे उचित आहे का, असा प्रश्न सरळगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नेताजी घुडे यांनी शासनाला विचारला होता.तसेच लवकरात लवकर रोजगार हमीचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली होती. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच शासनाला जाग येऊन मुरबाड पंचायत समितीकडे थकीत निधी पाठवला आहे. याबाबत सरळगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व तालुक्यातील अनेक सरपंच व ग्रामसेवकांनी लोकमतचे आभार मानले आहेत.>निधी मिळत नाही आणि मजुरीचा दर कमी यामुळे हजारो मजुरांचे घाटमाथ्यावर, वीटभट्टीवर स्थलांतर झाले आहे. शासनाचा मजुरीचा दर कमी व तीही वेळेवर मिळत नसल्याने तालुका कृषी विभागात अवघ्या २७ मजुरांची नोंद झाली आहे. हीच परिस्थिती सार्वजनिक बांधकाम खात्यात आहे.