शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर गोळीबाराचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल; आमदार गायकवाड यांच्या संतापाने पोलीस हादरले

By सदानंद नाईक | Updated: February 6, 2024 20:11 IST

गोळीबार घटनेचा ११ मिनिटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

उल्हासनगर: हिललाईन पोलीस ठाण्यातील आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल झाल्याने, आमदारांचा संताप बघून पोलिसही हादरले आहे. वरिष्ठ पोलिसांनी त्यांच्या हातातील रिव्हॉल्वर हिसकावून घेतली नसतील मोठा अनर्थ घडला असता. असे पोलिसांचे म्हणणे आहे.

उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्यात २ फेब्रुवारी रोजी दुपारी शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यासह ६० ते ७० जणांवर द्वारली येथील वादग्रस्त जमिनीवर प्रवेश केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. तर रात्री साडे नऊ वाजता जमीनमालक जाधव कुटुंबाच्या तक्रारीवरून आमदार गणपत गायकवाड यांच्यासह ८ जणांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला. याबाबतच्या चौकशीसाठी हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिन मध्ये सुरवातीला आमदार पुत्र वैभव गायकवाड, त्यानंतर शिवसेना नेते महेश गायकवाड, राहुल पाटील व जमीनमालक चैनू जाधव आले होते. पावणे ११ वाजता आमदार गणपत गायकवाड केबिन मध्ये आल्यावर वैभव गायकवाड केबिन बाहेर गेले. त्यानंतर केबिन बाहेर समर्थकात शिवीगाळ, हाणामारी, धक्काबुकीं व शस्त्र काढण्याचे प्रकार झाले. त्यांना शांत करण्यासाठी पोलीस अधिकारी जगताप केबिन बाहेर गेल्यानंतर, आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. 

यापूर्ण गोळीबार घटनेचा ११ मिनिटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलीस ठाणे अंतर्गतील गोळीबाराचे व्हिडीओ कोण व्हायरल Hकरत आहे? असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. व्हिडीओ मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या केबिन मध्ये सुरवातीला आमदार पुत्र वैभव गायकवाड, शिवसेना नेते महेश गायकवाड, राहुल पाटील, चैनू जाधव बसलेले दिसतात. आमदार गणपत गायकवाड हे केबिन मध्ये आल्यानंतर वैभव गायकवाड बाहेर जातात. मात्र सर्वांचे लक्ष केबिन बाहेरील समर्थकात चाललेल्या धिंगाण्याच्या सीसीटीव्हीवर असते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप केबिन बाहेर समर्थकांना बाहेर जाताच, आमदार गणपत गायकवाड यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे.

पोलिसांची दमछाकआमदार गायकवाड यांच्या गोळीबाराचा आवाज ऐकताच पोलीस अधिकारी जगताप यांच्यासह अन्य कर्मचारी केबिन मध्ये आले असता, शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्या अंगावर बसून आमदार गणपत गायकवाड मारहाण करतात. त्यांना शांत करतांना पोलिसांची चांगलीच दमछाक उडाल्याचे दिसते. आमदारांच्या हातांतील रिव्हॉल्वर पकडून ठेवली नसतीतर, त्यामध्ये शिल्लक दोन गोळ्या फायर झाल्या असत्या.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरGanpat Gaikwadगणपत गायकवाड