शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

फुल मार्केट लवकरच नवीन इमारतीत

By admin | Updated: May 2, 2017 02:11 IST

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पत्र्याच्या शेडमध्ये असलेले फुल मार्केट फुलविक्रेत्यांसाठी अत्यंत गैरसोयीचे आहे

मुरलीधर भवार / कल्याणकल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पत्र्याच्या शेडमध्ये असलेले फुल मार्केट फुलविक्रेत्यांसाठी अत्यंत गैरसोयीचे आहे. त्यांची ही अडचण लक्षात घेऊन समितीने नवीन वास्तू उभारण्यासाठी बांधकाम परवानगी मिळावी, असा प्रस्ताव केडीएमसीला सादर केला होता. त्यास केडीएमसीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे नवीन फुल मार्केट बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कल्याण बाजार समितीच्या आवारात १५ वर्षांपासून सुरू असलेल्या फुल मार्केटमध्ये पावसाळ्यात पाणी साचत होते. त्यामुळे फुलविक्रेत्यांचा माल भिजून त्याचे नुकसान होते. पत्र्याची शेड अत्यंत जुनी झाली आहे. तेथे पिण्याचे पाणी तसेच प्रसाधनगृहाची सोय नाही. त्यामुळे येथे येणारे विक्रेते व ग्राहकांचे अतोनात हाल होतात. या फुल मार्केटमध्ये कल्याण तालुक्याबरोबरच नगर, पुणे येथील शेतकरी माल घेऊन येतात. वर्षाला या बाजारात ५५ कोटी रुपयांची उलाढाल होते. दादर फुल मार्केटनंतर कल्याण ही ठाणे जिल्ह्यातील मोठी फुल बाजारपेठ आहे. पंचक्रोशीतील हारफुलविक्रेते या बाजारातून माल नेतात. त्यामुळे फुल बाजारासाठी अद्ययावत इमारत बांधण्याचा प्रस्ताव बाजार समितीने तयार केला.फुल मार्केटमध्ये महापालिकेच्या जागेत २१०, तर बाजार समितीच्या जागेत १९६ फुलविक्रेते व्यवसाय करतात. या दोन्ही फुलविक्रेत्यांसाठी तळ अधिक एक मजल्याची भव्य फुलमार्केटची वास्तू उभारली जाणार आहे. ख्यातनाम वास्तुविशारद शशी प्रभू यांच्याकडून त्याचा आराखडा तयार करून घेण्यात आला आहे. हे मार्केट उभारण्यासाठी किमान १६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. फुलविक्रेत्यांकडून त्याचे पैसे घेऊन त्यांना अद्ययावत सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. या इमारतीत ११६ भाजीपालाविक्रेत्यांनाही सामावून घेतले जाईल. जे व्यापारी पैसे देतील, त्यांना या नव्या इमारतीत गाळे दिले जाणार आहे. नव्या वास्तूच्या बांधकाम परवानगीचा प्रस्ताव महापालिकेच्या नगररचना खात्याकडे पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर केला जात नसल्याने त्याची गंभीर दखल भाजपा आमदार किसन कथोरे यांनी घेतली. कथोरे यांनी बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांच्यासह आयुक्त ई. रवींद्रन यांची मागील महिन्यात भेट घेतली. त्यावेळी फुल मार्केटच्या बांधकामास परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यावर, आयुक्तांनी लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत फुल मार्केटच्या नव्या वास्तूच्या बांधकामास महापालिकेने परवानगी दिली आहे. बाजार समितीने नुकतीच एक बैठक घेऊन पुढील कार्यवाहीस मंजुरी दिली आहे. महिनाभरात बांधकामासाठी निविदा मागवली जाईल. नव्या फुल मार्केटच्या वास्तूतील पहिल्या मजल्यावर फुलांसाठी शीतगृह असेल. त्यामुळे फुले खराब होणार नाहीत, असे घोडविंदे यांनी सांगितले.पाठपुराव्याचे श्रेय ‘लोकमत’लाफुल मार्केटच्या दुरवस्थेवर ‘लोकमत’ने आॅगस्ट २०१६ मध्ये प्रकाश टाकला होता. त्यानंतर, फुल मार्केटच्या बांधकामास पालिकेकडून परवानगी दिली नसल्याचे वृत्तही नुकतेच प्रसिद्ध केले होते. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे फुलविक्रेत्यांना नवे फुल मार्केट उपलब्ध होणार आहे, अशी बाब खुद्द घोडविंदे यांनी कबूल केली आहे. हे श्रेय ‘लोकमत’चे आहे, असे ते म्हणाले.