शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक मनोज म्हात्रे हत्या प्रकरणातील फरार आरोपीस पाच वर्षांनी अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 15:10 IST

सुशांत भास्कर म्हात्रे ( वय २८ वर्षे, रा. कालवार ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो हत्या झाल्या पासून सुमारे पाच वर्षांपासून फरार होता.

भिवंडीभिवंडीतील काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे यांची १४ फेब्रुवारी २०१७ रोजी हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी फिर्यादी प्रदिप मनोहर म्हात्रे ( रा.कालवार ) यांनी फिर्याद दिली असता त्यांच्या फिर्यादीवरून या हत्ये प्रकरणी मनोज म्हात्रे यांच्याच कुटुंबातील आरोपी प्रशांत म्हात्रे यांच्यासह अनेकांना नारपोली पोलीसांनी अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणातील आणखी फरार आरोपींचा नारपोली पोलीस शोध घेत असतांनाच या प्रकरणातील आणखी एका आरोपीस नारपोली पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. 

सुशांत भास्कर म्हात्रे ( वय २८ वर्षे, रा. कालवार ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो हत्या झाल्या पासून सुमारे पाच वर्षांपासून फरार होता. आरोपी सुशांतचा शोध नारपोली पोलीस घेत असतांनाच तो भिवंडी – वसईरोड येथील नारपोली तलावाजवळ येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा रचुन त्यास मोठ्या शिताफीने नारपोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्याचा सदर गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाला असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी दिली आहे.

फरार आरोपीस अटक करण्यासाठी भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक अधिकारी सहा पोलीस निरीक्षक चेतन पाटील, पोलीस उप निरीक्षक रोहन एल शेलार, पोहवा बोडके, पोलीस हवालदार नवले, पोना सहारे, पोना शिंदे, पोलीस शिपाई क्षिरसागर, पोशि सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. 

टॅग्स :Bhiwandiभिवंडी