शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

कार खेचून केला इंधन दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 04:17 IST

महागाईने जनतेचे कंबरडे मोडलेले असतानाच मंगळवारपासून पुन्हा इंधनाचे दर वाढले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड

ठाणे : महागाईने जनतेचे कंबरडे मोडलेले असतानाच मंगळवारपासून पुन्हा इंधनाचे दर वाढले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी चक्क गाडी ओढून आणि दुचाकीला हातगाडीवर ठेवत पेट्रोलपंपापर्यंत नेऊन मोदी सरकारचा निषेध केला. तसेच पंपावर नागरिकांना काळ्या गुलाबाची प्रतिकृती देत दरवाढीसह भाजपा सरकारचा निषेध केला.पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे देशातील सर्वसामान्य जनता महागाईच्या वणव्यात होरपळत असल्याचा आरोप ठाणेराष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी केला. या आंदोलनात विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांनीही सहभाग घेतला होता. गरिबांची चेष्टा बंद करा, पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, मोदी सरकार हाय-हाय, पेट्रोल-डिझेल दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.यावेळी माजी खासदार तथा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले की, सबंध देशाचा विचार केल्यास राज्यात इंधनावर सर्वाधिक कर आकारले जात आहेत. महागाईने जनता मेटाकुटीला आलेली असतानाही अशी दरवाढ केली जात असल्याने गरिबांना जगावे कसे, असा प्रश्न पडला आहे. आता असे जुलमी सरकार खाली खेचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा दिला.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडीNCPराष्ट्रवादी काँग्रेस