शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

चोरीचे मोबाइल सांभाळण्याची डोकेदुखी; जुने २०० मोबाइल घ्यायला ‘स्मार्ट’मालक फिरकेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 03:06 IST

- पंकज रोडेकरठाणे : मोबाइलचोरीची सुसाट लोकल गेल्या काही दिवसांपासून ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत धावत आहे. त्यातच, लोहमार्ग पोलिसांनी या घटनांना आळा बसवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यातूनच, पोलीस तपासात स्मार्ट फोनपूर्वीचे हस्तगत केलेले जुने मोबाइल सांभाळणे आता एक नवी जबाबदारी पोलिसांच्या अंगावर येऊन पडली आहे. कारण, ते ...

- पंकज रोडेकरठाणे : मोबाइलचोरीची सुसाट लोकल गेल्या काही दिवसांपासून ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत धावत आहे. त्यातच, लोहमार्ग पोलिसांनी या घटनांना आळा बसवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यातूनच, पोलीस तपासात स्मार्ट फोनपूर्वीचे हस्तगत केलेले जुने मोबाइल सांभाळणे आता एक नवी जबाबदारी पोलिसांच्या अंगावर येऊन पडली आहे. कारण, ते घेण्यासाठी तक्रारदार येत नसल्याचे समोर आले आहे. तसेच हा इलेक्ट्रॉनिक कचरा नष्ट करण्यासाठी कोणतेही आदेश नसल्याने ती डोकेदुखीच ठाण्यासह इतरही रेल्वे पोलिसांना होऊन बसल्याचे सूत्रांनी सांगितले.ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दररोज चार ते पाच मोबाइलचोरीचे गुन्हे दाखल होत आहेत. जून २०१७ पासून लोहमार्ग पोलीस ठाण्यात मोबाइलचोरीबाबत ‘एफआयआर’ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच, मागील वर्षभरात ३००२ मोबाइलचोरीची नोंद झाली आहे. इतर गुन्ह्यांपेक्षा मोबाइलचोरीच्या या वाढत्या घटना लक्षात घेऊन लोहमार्ग पोलिसांनी पेट्रोलिंगवर भर दिला. साध्या वेशातील पोलीस फलाटांवर तैनात केले. एवढेच नाहीतर रेकॉर्डवरील मोबाइलचोरट्यांची ‘टॉप २५’ ही यादी अद्ययावतही केली आहे. त्यामुळे या चोरीच्या घटना मध्यंतरी कमी झाल्या होत्या. पण, पुन्हा त्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. तसेच दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासात चोरट्यांना पकडल्यावर त्यांच्याकडून मोबाइल हस्तगतही केले जात आहेत. पण, हस्तगत होणाऱ्या मोबाइलमध्ये (अ‍ॅण्ड्राइड) स्मार्ट फोन असेल, तर तक्रारदार येऊन मोबाइल घेऊन जातात. पण, अ‍ॅण्ड्राइडपूर्वीचे मोबाइल घेण्यासाठी कोणी येत नाही. त्यामुळे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात जवळपास २०० जुने मोबाइल आहेत. तसेच ते नष्ट करण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत. यामुळे ते नष्टही करता येत नाही. त्यामुळे ते सांभाळून ठेवण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे हे जुने मोबाइल सुरक्षेसह एका बॉक्समध्ये ठेवल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.10% गुन्ह्यांचे प्रमाण बाहेरचेरेल्वेच्या हद्दीबाहेर चोरीला जाणाºया मोबाइल फोनची तक्रार ही ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यासाठी नागरिक येतात. हे प्रमाण साधारणत: १० टक्के आहे. त्यातूनच रेल्वेत मोबाइलचोरीचे प्रमाण वाढत आहे. तसेच लोकल प्रवासातून उतरताना मोबाइल चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर त्या स्थानकाच्या हद्दीत तक्रार दाखल करण्यासाठी नागरिक येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Mobileमोबाइल