शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

इमारत पाडून जागा मोकळी करा - न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 05:16 IST

न्यायालयाचे आदेश : प्रकल्पबाधित वृद्धेला एक तपानंतर न्याय

कल्याण : गोविंदवाडी बायपास रस्त्यात घर बाधित झाल्याने केडीएमसीने अजमत आरा या ७३ वर्षांच्या आजीबार्इंना कचोरे येथे जागा दिली होती. मात्र, त्याच जागेवर महापालिकेने बीएसयूपी योजनेंतर्गत इमारत बांधली. याप्रकरणी आरा यांनी २००६ मध्ये कल्याण न्यायालयात दाद मागितली. त्यावर न्यायालयाने एक तपानंतर निर्णय देताना आरा यांना दिलेल्या जागेवर बांधलेली इमारत पाडून जागा मोकळी करून देण्याचे आदेश केडीएमसीला दिले आहेत.

आरा यांचे घर रस्त्यात बाधित झाल्याने त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेने त्यांना कचोरे येथे १२० चौरस मीटरची जागा दिली. मात्र, त्याचा ताबा आरा यांना कधीच मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी कल्याण न्यायालयात दाद मागितली. दुसरीकडे महापालिकेने बीएसयूपी योजनेतून आरा यांच्या जागेवर सहा मजली इमारत उभारली. आरा यांना जागा दिल्याचा महापालिकेला विसर पडला. या सर्व बाबी न्यायालयात उघड झाल्या. त्यामुळे बीएसयूपीची इमारत पाडून आरा यांना जागा मोकळी करून द्या, असे आदेश न्यायालयाने महापालिकेस दिले. एक तपानंतर न्याय मिळाल्याने आरा यांनी आनंद व्यक्त केला आहे, अशी माहिती आरा यांचा मुलगा सय्यद यांनी दिली.

सय्यद म्हणाले, आई आरा यांना १२० चौरस मीटरची जागा कचोरे येथे देण्यात आली होती. ही जागा देण्याचे रद्द केल्याची माहिती महापालिकेचे अधिकारी अमित पंडित यांनी न्यायालयात दिली होती. न्यायालयात चुकीची माहिती दिल्याबद्दल पंडित यांच्याविरोधात खाजगी दावा दाखल करण्यात आहे.1400घरांचे वाटपबीएसयूपी योजना १७ ठिकाणी चार टप्प्यांत उभारली जाणार होती. काही ठिकाणच्या जागा ताब्यात नसताना कंत्राटदारांना कार्यादेश दिला गेला. त्यामुळे त्यांना काम सुरू करता आले नव्हते. तसेच कंत्राटदारांनी न्यायालयात धाव घेत कामातून अंग काढून घेतले.बीएसयूपीचे लाभार्थी निश्चित झालेले नसल्याने बांधलेली घरे पडून आहेत. केवळ एक हजार ४०० घरांचे वाटप झाले आहे. बीएसयूपीच्या कामाबाबत अनेक तक्रारी सरकार, म्हाडा यांच्याकडे केल्या गेल्या. त्याची चौकशी सुरू आहे. काही प्रकरणे उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.अशा परिस्थितीत आरा यांच्या जागेवर बीएसयूपीची सहा मजली इमारत उभी राहिली. यावरून, महापालिकेच्या बीएसयूपी योजनेत किती गोंधळ व अनियमितता आहे, हे पुन्हा उघड झाले आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयthaneठाणे