शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कळवा खाडीच्या तिसऱ्या पुलाचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 00:41 IST

ठाणे कळवा खाडीवर उभारण्यात येणा-या तिस-या पुलाचे काम येत्या डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे.

ठाणे : ठाणे कळवा खाडीवर उभारण्यात येणा-या तिस-या पुलाचे काम येत्या डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे. परंतु हा खाडीपूल एका बाजूने साकेतच्या दिशेने खाली उतरणार असल्याने त्या ठिकाणी कांदळवनाचे क्षेत्र बाधित होणार होते. त्यामुळे ते पालिकेकडे वळते करण्यासंदर्भात ठाणे महापालिकेकडे राज्य शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावानुसार राज्य शासनाने येथील ०.२७४ हेक्टर कांदळवनक्षेत्र हे वळते करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या खाडीपुलाच्या मार्गातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे.मुंबईच्या सी लिंकच्या धर्तीवर ठाणे महापालिकेनेदेखील विटावा पुलाखालील आणि एकूणच या भागातील वाहतूककोंडी सुटावी यासाठी कळवा खाडी पुलावर तिसºया नवीन पुलाच्या कामाचा प्रस्ताव जानेवारी २०१२ मध्ये पुढे आणला होता. सध्या येथील कळवा खाडीवर एक ब्रिटिशकालीन आणि आणि एक नवा पूल आहे; परंतु ब्रिटिशकालीन पूल कमकुवत झाल्याने त्या पुलावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे दुसºया पुलावर वाहतुकीचा वेग मंदावला असून तोही वाहतुकीसाठी कमी पडू लागल्याने पालिकेने तिसºया पुलाचा पर्याय पुढे आणला. आता कांदळवनाचा प्रश्न सुटल्याने हे कामही मार्गी लागणार आहे.>असा आहे तिसरा पूलमहापालिकेने २०११ च्या आर्थिक वर्षात यासाठी १० कोटींची तरतूद केली होती. आता त्यावर १८३ कोटींचा खर्च केला जात आहे. जुन्या दोन पुलांच्या बाजूलाच मात्र त्यांच्यापेक्षा थोड्या उंचीवर तो उभारण्यात येणार आहे. ठाण्याकडून विटाव्याकडे जाण्यासाठी हा वनवे पूल असणार आहे. तर विटाव्याकडून येणाºया वाहनांसाठी जुन्या पुलाचा पर्याय ठेवला आहे.या तिसºया पुलामुळे येथील वाहतूककोंंडी सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. ठाण्याकडून खारेगांव (मनीषानगर) आणि विटाव्याच्या पुढे म्हणजेच ठाणे-बेलापूर दिशेला असा दोनही मार्गाने तो खाली उतरणार आहे. तसेच कळव्याकडून ठाण्याकडे येताना तो साकेत, जेल तलाव आणि कोर्टनाका मार्गे ठाणे स्टेशनकडे खाली उतरणार आहे. तसेच आता यात थोडा बदल केला असून आत्माराम चौकापर्यंतचा रस्ता त्याला जोडण्यात येणार आहे. केबल स्टेड टाइपचा हा पूल असणार असून तो दीड किमीचा असणार आहे. यामुळे विटाव्या पुलाखालील आणि कळवानाक्यावर होणारी वाहतूक कोंडी फुटणार असल्याचेही पालिकेचे म्हणणे आहे.>डिसेंबरअखेर काम पूर्ण करण्याचा दावायेत्या डिसेंबर अखेर या पुलाचे काम पूर्ण होईल, असा दावा आता पालिकेने केला होता; परंतु यामध्ये खाडीतील बाधित होणारे कांदळवन हा प्रमुख अडथळा ठरत होता. त्यामुळे येथील ०.२७४ हेक्टर कांदळवनक्षेत्र वळते करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार गुरुवारी राज्य शासनाच्या अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) यांनी वनविभागाकडील हे क्षेत्र वळते करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खाडीतही पालिकेला पुलाचे काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे कदाचित डिसेंबरअखेर तो वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो, असा दावा पालिकेने पुन्हा एकदा केला आहे.