शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील मॉलमध्ये पार्किंग मोफत करा,भाजपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 01:18 IST

पुणे आणि नाशिक महापालिकांनी शहर विकास नियंत्रण नियमावलीची अंमलबजावणी केल्याने शहरातील मॉल व मल्टिप्लेक्समध्ये नागरिकांना मोफत पार्किंगची सुविधा मिळाली आहे. त्या

ठाणे : पुणे आणि नाशिक महापालिकांनी शहर विकास नियंत्रण नियमावलीची अंमलबजावणी केल्याने शहरातील मॉल व मल्टिप्लेक्समध्ये नागरिकांना मोफत पार्किंगची सुविधा मिळाली आहे. त्याच धर्तीवर ठाणे शहरातील मॉल व मल्टिप्लेक्समध्ये मोफत पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवक मनोहर डुंबरे आणि दिवा भाजपचे सरचिटणीस रोहिदास मुंढे यांनी निवेदनाद्वारे महापौर मीनाक्षी शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे.शहर विकास नियंत्रण नियमावलीनुसार व्यावसायिक इमारतींमध्ये पार्किंगची व्यवस्था करून मोफत पार्किंग सुविधा उपलब्ध करून देणे संबंधित व्यावसायिकांना बंधनकारक आहे. मात्र, या नियमाला हरताळ फासून ठाणे शहरातील मॉल्स-मल्टिप्लेक्समध्ये नागरिकांना चारचाकी वाहने व दुचाकींसाठी स्वतंत्र पार्किंग शुल्क आकारले जात आहे. याउलट, पुणे शहरात पार्किंग प्रश्न बिकट झाल्यावर आठ दिवसांपूर्वी नागरिकांसाठी सर्व मॉल्समध्ये मोफत पार्किंग उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेऊन पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने ठराव मंजूर करून महापालिकेच्या विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. या ठरावाच्या अंमलबजावणीबाबत मॉल व्यवस्थापनाने टाळाटाळ करताच महापालिकेने या मॉल मल्टिप्लेक्सला नोटिसा बजावल्या होत्या.या नोटिसांनंतर शहरातील मॉलमध्ये मोफत पार्किंगची अंमलबजावणी सुरू झाली. पुण्यानंतर नाशिक महापालिकेनेदेखील ठराव करून मॉलमध्ये मोफत पार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पुणे व नाशिकप्रमाणेच ठाणे शहरातील पार्किंगचा प्रश्नसुद्धा जटिल झाला आहे.मुख्य शहराबरोबरच मॉलच्या परिसरात उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत असून या वाहतूककोंडीमुळे नागरिकांचा नाहक वेळ वाया जात आहे. म्हणूनच, ठाणे शहरातदेखील मॉल व मल्टिप्लेक्समध्ये मोफत पार्किंगच्या नियमाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

टॅग्स :tmcठाणे महापालिकाthaneठाणे