शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीतील नव्या रिक्षांसाठीच्या इरादापत्रास विनामूल्य मुदतवाढ मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 18:17 IST

ज्या रिक्षा चालकांना इरादा पत्र मिळाले आहे, त्यांना वाहन घेण्यासाठी कर्ज काढण्यापासून विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात इरादापत्राची मुदत ही सहा महिन्यांची असते, ती संपण्याची वेळ आता जवळ येत आहे. पण अनेकांनी रिक्षा घेतलेल्या नाहीत, त्या मुदतीत विनामूल्य वाढ करावी अशी मागणी युनियनने केली आहे.

ठळक मुद्देरिक्षा चालक-मालक युननियनची मागणी कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांना साकडे

डोंबिवली: मागेल त्याला परमीट (इरादा पत्र) या राज्य शासनाच्या बेरोजगारी कमी करण्यासाठीच्या उपक्रमाचे डोंबिवली रिक्षा चालक मालक युनियनने अभिनंद केले, पण ज्या रिक्षा चालकांना इरादा पत्र मिळाले आहे, त्यांना वाहन घेण्यासाठी कर्ज काढण्यापासून विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात इरादापत्राची मुदत ही सहा महिन्यांची असते, ती संपण्याची वेळ आता जवळ येत आहे. पण अनेकांनी रिक्षा घेतलेल्या नाहीत, त्या मुदतीत विनामूल्य वाढ करावी अशी मागणी युनियनने केली आहे.यासंदर्भात संस्थेचे उपाध्यक्ष शेखर जोशी, कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे, सचिव भिकाजी झाडे आदींनी कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांना त्यासंदर्भात गुरुवारी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी इरादापत्र मिळाले असले तरी संबंधित लाभार्थ्यांना भेडसावणा-या असंख्य अडचणींमुळे अनेकांनी वाहने घेतलेली नाहीत. इरादापत्राची मुदत ही सहा महिने असते. त्यामुळे इरादापत्र मिळाल्यापासून सहा महिन्यात वाहन खरेदी करुन त्याचे आरटीओकडुन पासिंग करुन घेणे बंधनकारक असते. पण अनेकांकडे कर्ज घेण्यासाठी जी अनामत रक्कम असते ती नसणे, कर्जाच्या बदल्यात रिक्षा या सुविधेत वाहने उपलब्ध नसणे, विविध ठिकाणच्या शोरुममध्ये रिक्षा उपलब्ध नसणे अशा विविध तांत्रिक अडचणींना संबंधित लाभार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मागणी आणि तसा पुरवठा बाजारात होत नसल्याने अनेकांना इरादापत्र रद्द होणार असल्याचे दडपण आहे. त्यासाठी परिवहन विभागाने युननियची मागणी तातडीने मान्य करावी आणि हजारो इरादापत्र धारकांना दिलासा द्यावा असे साकडे जोशी यांनी परिवहन अधिका-यांना घातले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीRto officeआरटीओ ऑफीस