शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १८ हजार बालकांना मोफत शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:48 IST

‘आरटीई’ अंतर्गत लाभ : जि.प.ची माहिती

ठाणे : दुर्बल घटकातील बालकांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम (आरटीई) अंतर्गत २५ टक्के शाळा प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. ठाणे जिल्ह्यातील अनुदानित व खासगी अनुदानित शाळांमध्येदेखील ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून चार वर्षांत शहरी व ग्रामीण भागांतील १८ हजार ४२० मुलांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.आरटीई अधिनियम २००९ अन्वये वंचित व दुर्बल घटकातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. ठाणे जिल्ह्यातील ६५२ अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सहा महानगरपालिका आणि पाच तालुक्यांतील शाळांनी ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून पटसंख्येची माहिती भरली होती. तसेच पालकांनीही ऑनलाइनद्वारे आपल्या पाल्यांचे अर्ज शाळा प्रवेशासाठी दाखल केले. २०१६-१७ पासून ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली. सर्वाधिक मुलांना प्रवेशजिल्ह्यात चार वर्षांत १८ हजार ४२० बालकांना उच्च प्रतीच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळाला. २०१९-२० मध्ये सर्वाधिक पाच हजार ८६६ बालकांना उच्च प्रतीच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळाला आहे. तर, २०१६-१७ मध्ये सर्वांत कमी दोन हजार ५५४ बालकांनीच प्रवेश घेतला होता.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा