शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर महापालिकेकडून शेतकऱ्यांना कंपोस्ट खताचे मोफत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 21:47 IST

पालिका उद्यानां मधील पालापाचोळा तसेच ओल्या कचरया पासुन तयार केलेल्या कंपोस्ट खताचे शेतकरयांना मोफत वाटप करण्याचा अभिनव उपक्रम मीरा भाईंदर महापालिकेने सुरु केलाय.

धीरज परब

 मीरारोड - पालिका उद्यानां मधील पालापाचोळा तसेच ओल्या कचरया पासुन तयार केलेल्या कंपोस्ट खताचे शेतकरयांना मोफत वाटप करण्याचा अभिनव उपक्रम मीरा भाईंदर महापालिकेने सुरु केलाय. आज नववर्षाच्या सुरवातीला पालिकेने शेतकरयांना ५०० किलो कंपोस्ट खताचे मोफत वाटप केले. शिवाय गृहनिर्माण संस्थांनी कंपोस्ट खत प्रकल्प उभारल्यास त्यांना मालमत्ता करात सवलत दिली जाणार आहे.मीरा भार्इंदर महापालिकेने जेसल पार्क, सुभाषचंद्र बोस मैदान, नवघर आदी ४ ते ५ ठिकाणी ओल्या कचरया पासुन कंपोस्ट खत तयार करण्याचे छोटे छोटे प्रकल्प सुरु केले आहेत. उरलेल्या भाज्या, भाज्यांचा कचरा याच बरोबर झाडं - रोपांचा पालापाचोळा या पासुन कंपोस्ट खत तयार केले जात आहे.पालिकेच्या या छोट्या छोट्या खत प्रकल्पातुन मिळालेल्या कंपोस्ट खताचे शेतकरयांना मोफत वाटप करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी घेतला आहे.आज सोमवारी नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ( नगरभवन) येथे पालिकेने शेतकरयांना मोफत खत वाटपचा उपक्रम सुरु केला. मुर्धा, राई, मोर्वा तसेच अर्नाळ येथील शेतकरी असलेले निळकंठ भोईर, चंद्रश पाटील, चंद्रकांत राऊत, जयकिशन पाटील, कमलेश पाटील, भावेश पाटील, सुनिल पाटील, दिनेश भोईर, लिलाधर पाटील, प्रशांत म्हात्रे, राजेश पाटील, मंगेश पाटील, रमेश पाटील आदिंना कंपोस्ट खताचे वाटप करण्यात आले.उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उद्यान अधिक्षक नागेश विरकर आदिंनी शेतकरयांना खत वाटप केले. सुमारे ५०० किलो कंपोस्ट खताचे मोफत वाटप या वेळी करण्यात आले.शेतकरयांचा सात बारा उतारा पाहुन तसेच त्याची निकड पाहुन मोफत खत दिले जाणार आहे. या पुढे मीरा भार्इंदर मधील शेतकरयांनाच खत दिले जाईल. कंपोस्ट खताचा फायदा शेतकरी, बागायतदार यांना मिळावा. त्यांनी शेतातील पालापाचोळा जाळुन न टाकता खत प्रकल्पासाठी त्याचा वापर करावा म्हणुन प्रोत्साहन देण्याची पालिकेची भुमिका आहे. शेतकरयांना त्यांच्या पिक वा लागवडीसाठी सेंद्रिय खताच वापरा मुळे होणारे फायदे यातुन कळतील.शेतकरयां सोबतच गृहनिर्माण संस्थांना सुध्दा कंपोस्ट खत प्रकल्प उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या इमारतीतील रहिवाशांचा ओला कचरा, पाला पाचोळा याची विल्हेवाट त्यांच्याच इमारतीच्या आवारात केल्यास मालमत्ता करात सवलत दिली जाणार आहे असे डॉ. पानपट्टे म्हणाले.महापालिकेच्या उद्यानां मध्ये निर्माण होणारा रोजचा पाला पाचोळा व ओला कचरा याच्या पासुन देखील खत तयार केले जाणार आहे. पालिकेच्या २२ उद्यानां मध्ये कंपोस्ट खत प्रकल्प तयार करायला घेतले आहेत. यातुन आणखी मोठ्या प्रमाणात खत उपलब्ध होणार आहे. सदर खत शेतरयांना मोफत देण्यास पालिकेच्या रोपं, झाडांना सुध्दा वापरले जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले.गृहनिर्माण संस्था, उद्यानं, शेती, बागायती आदि ठिकाणी निर्माण होणारया ओल्या कचरयाची विल्हेवाट त्या त्या ठिकाणीच लावण्यासाठी प्रोत्साहन देतानाच कंपोस्ट खताचे उत्पादन करण्यासाठी पालिका व्यापक मोहिम हाती घेणार असल्याचे डॉ. पानपट्टे यांनी सांगीतले.