शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गरीब रुग्णांना मोफत डायलेसिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:56 IST

कोपरी येथील प्रसूतिगृहात सुरूकरण्यात आलेल्या नव्या डायलेसिस सेंटरचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

ठाणे : कोपरी येथील प्रसूतिगृहात सुरूकरण्यात आलेल्या नव्या डायलेसिस सेंटरचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर, आता सोमवारपासून ते ठाणेकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात पाच ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या डायलेसिस सेंटरमध्ये एक लाखापर्यंत कमी उत्पन्न असलेल्या रु ग्णांना ही सुविधा मोफत राहणार आहे. सध्या तीन केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. उर्वरित दोन सेंटर येत्या दीड ते दोन महिन्यांत सुरू होतील, अशी माहिती मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आर.टी. केंद्रे यांनी दिली आहे.प्रत्येक केंद्रावर १० डायलेसिस मशीन अशा पाच केंद्रांवर ५० मशीन ठेवण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक केंद्रावर १० बेड अशा पाच केंद्रांवर ५० बेड उपलब्ध करून दिले आहेत. या डायलेसिस केंद्रांमध्ये ज्याचे वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत आहे, त्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. तर, ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख ते आठ लाख आहे, त्या रुग्णांसाठी ५२० रुपये फी आकारण्यात येणार आहे. तसेच ८ लाखांच्यावर उत्पन्न असलेल्या रुग्णांसाठी १०४० रुपये फी आकारण्यात येणार आहे. शहरात पहिल्या टप्प्यात कोपरी प्रसूतिगृह, कोपरी (पूर्व), कोरस रु ग्णालय, वर्तकनगर, ठाणे (प.) आणि रोझा गार्डिनिया हॉस्पिटल, कासारवडवली अशा तीन ठिकाणी ही केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. उर्वरित सी.आर. वाडिया रु ग्णालय आणि डॉ. काशिनाथ घाणेकर आरोग्य केंद्र येत्या दोन महिन्यांत सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्रे यांनी स्पष्ट केले.ठाणे शहराबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागांतून येणाºया डायलेसिसच्या रुग्णांना अल्पदरात डायलेसिसच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. विशेष म्हणजे कळवा रुग्णालयात सुरू असलेल्या डायलेसिस सेंटरचा मुद्दा काही वर्षांपूर्वी चांगलाच वादग्रस्त ठरला होता.