शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राट देण्याच्या नावाखाली ३२ लाखांची फसवणूक: आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 22:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अंबरनाथच्या आयुध निर्माण कारखान्यातील उपहारगृहाचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील जगदीप दुबे यांची ३२ ...

ठळक मुद्दे खंडणी विरोधी पथकाने केली होती अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अंबरनाथच्या आयुध निर्माण कारखान्यातील उपहारगृहाचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील जगदीप दुबे यांची ३२ लाखांची फसवणूक करणाऱ्या रोहित शेट्टी उर्फ अकबर पाशा याच्या पोलीस कोठडीमध्ये चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्याला १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.रोहित याने त्याचे साथीदार भगवान पवार, पल्लवी पवार, विठाबाई पवार आणि विनोद शेट्टी यांच्या मदतीने दुबे यांना अंबरनाथ येथील आयुध निर्माण कारखान्यातील उपहारगृहाचे कंत्राट मिळवून देण्याचे अमिष दाखविले होते. त्यासाठी त्यांच्याकडून जानेवारी २०१६ ते ११ डिसेंबर २०२० या काळात त्याने ३२ लाख रु पये घेतले. त्यानंतर दुबे यांच्या नावाने उपहारगृहाचे कंत्राट मंजूर झाल्याचा बनावट कार्यादेश त्यांना दाखविला होता. प्रत्यक्षात कोणतेही कंत्राट न देता त्यांच्या पैशांचा अपहार करु न त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात ११ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांमध्ये खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने त्याला १२ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. कासारवडवली पोलिसांनी अटक केल्यानंतर ठाणे न्यायालयाने त्याला १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या कोठडीची मुदत बुधवारी संपल्यानंतर कासारवडवली पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले. तेंव्हा ठाणे न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक